नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंद रस्ते
बंद रस्त्यांतले वेग मंद झाले
लढत्या राजांचे श्वास थंड झाले
भविष्य भाकरीस फिरे गोल रिंगण
बारच्या वारीत कुणी धूंद झाले
आश्वासनांनी हासले मन माझे
पाण्यात जाऊन त्यात कंद झाले
व्यर्थ विकासी स्वार्थी शतकी खेळी
अन् त्याचे अता मनात बंड झाले
हिम्मतीचे 'विजय' आज ते हारले
बलदंड ते शत्रू अधिक चंड झाले
घेऊन बंदूक उभे ठाकले हे
शोषितांना टिपण्याचे छंद झाले
राबणारे हात भुईकंप भासे
कहाणीचे त्या हजार खंड झाले
(मात्राव्रुत्त-मात्रा २०-२०)
राजेश जौंजाळ पोहणा
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
खुप छान!!!
Thank you, sir
Thank you, sir
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने