![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उभ्या पहाटे निघतो शेतात जाया बोचतो रे काटा त्याच्या अनवाणी पाया
साधंतो बांध घेउन फावडा खोरं
कधी शिकुण मोठं होणार माझ्या शेतकऱ्याचं पोरं
दिस दिस सरकत जाई
काळजी त्याच्या जीवाला खाई
करपलेल्या रानालाच घालीत असे फेऱ्या
कधी मोठा होनार हा शेतकऱ्याचा पोऱ्या
गाय शेळ्या पाळुन करतो रे जोड धंदा
पाण्यावाचुन अवघड आहे रे हा फंदा
थेंब थेंब साठवुनी भरत नाही रे डेरं
कधी शिकणार माझ्या शेतकऱ्याचं पोरं
कोरडाच वाहतो समदा वारा
तहान्या लेकरांचा जणु पोटाशी रे भारा
कर्जापोटी बॅंकेकडं घातलरे लई फेरं
कधी भाग्यवान होणारं माझ शेतकऱ्याचं पोरं
कधी पिकला माल पण नाही त्याला बाजार
इथं चिटकला जणु सारा भ्रष्टाचाराचा आजार
समदेच झाले रे लई चोरं
कधी शिकुन मोठं होणार माझं शेतकऱ्याचं पोरं.
Dnyaneshwar
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
निलेशजी
तुम्ही App वरुन लिहिलेला प्रतिसाद यशस्वीपणे प्रकाशित झाला आहे. धन्यवाद!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद सर
छान कविता
छान कविता
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद सर
पाने