नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दाण्यात दाना पेरून उगतो
फुकटच खाऊन ढेकुण फुगतो
किती जिवाचा होतो आटापिटा
मिळु दे थॉड शेतकऱ्याच्या ताटा
बिनं पाण्याचं आडतय चाक
मोडुन पडलंय तरी मारतुया हाक
नको तु असा टांगणीला लावु
माईला माझ्या सोन्यांनं मडवुन पाहु
कणगीतल दाण खवुटचं आटा
भरवुन ढेर व्हतंय माझाच तोटा
नको तु काढु कर्जाने काटा
पाझरू दे जरा दगडाचा पाटा
कुढाच्या घराला टनटनीच दार
बिन आढ्याला झालाय तटक्यांचा भार
तोंडाशी धरायची फकस्त मुसकी
मालाची किंमत लई बाजारात फुसकी
फाटकीच लुंगी फाटकच सदरा
भेगडली जमीन लई बसला हादरा
दुष्काळानं गिळलंय समदंच यंदा
पोटाला मारावा जणु काय रंदा.
नकोय मला कोणाचा आधार
मिळु दे माझ्या पिकाला बाजार
फ़ुलू दे माझ्या मातीतली कणसं
हसु दे जरा शेतातली माणसं.