नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनाज ( वऱ्हाडी बोली )
पेरा का नोका पेरू
खा ले त् लागतेच लागते
अनाजाचं म्हनसान...
ते तं काई कोन्या कारखान्यात पैदा होत नाई
अन् हे सांगाले कोन्या पंचागाची गरज नाई
बरं हे कोनाले ठाऊक नाई ...अश्यातलायी भाग नाई
अरे... तुमीच तं मारे बोंबलत फिरत रायत असत ना!
कास्तकार जगला पायजे
वावराची दशा पालटाले पायजे
बळीचं राज्य याले पायजे
बरं हे काई लयच कठीन काम हाये
अश्यातलायी भाग नाई
मंग काहून कानाडोया करता
बाकी काई म्हननं नाई बावा आमचं
काय दांगळो घालाचा तो घाला
बस्स एकडाव हमीभावाचं
अन् थ्या गयफासाचं जरासं मनावर घेजा
मंग पाहा कसं तुमाले
नाई डोक्श्यावर घिवून नाचोलं तं
लय सादंभादं काम असते रे आमचं
पन जास्त उशिर नोका लावजा
आता पयल्यासारख काम नाई रायलं बरं
लेकरं तुमच्याच शायेत शिकून रायले
पुस्तकं वाचून रायले
तिकळे गावं शयराले टेकून रायले......!
रवींन्द्र अंबादास दळवी,नाशिक
७०३८६६९५४२
प्रतिक्रिया
वास्तववादी कविता
वास्तववादी कविता
पाने