नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे.
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल.
प्रतिक्रिया
ह्या वर्षी पहिल्यांदाच असं
ह्या वर्षी पहिल्यांदाच असं झालंय की कोरोना मुळे माझी युरोप टुर रद्द झाली .......
नाही तर दरवर्षी.......पैशांमुळे रद्द करावी लागायची...
शेतकरी तितुका एक एक!
अपमान की प्रेम...?
अपमान की प्रेम...?
नवऱ्याने बायकोला विचारले: "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही
मला तुम्हीच आवडता
बायको कटकट करते म्हणून भरल्या
बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरुन उठल्याची बरीच उदाहरणे आहेत...
पण
तिने कितीही कटकट केली तरी भरल्या ग्लासावरून उठल्याची इतिहासात नोंद नाही
महिला :- डॉक्टर माझं डोकं खुप
महिला :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर :- मॅडम, सिटी स्कॅन करावा लागेल.
महिला :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
शेतकरी तितुका एक एक!
वाचा व शेवटी गंमत बघा
वाचा व शेवटी गंमत बघा
खरोखचर आपल्याला दररोज वर्तनामपत्र वाचाचयी खूप आवड असते. वर्तनामपत्रात येणाऱ्या वेगवेवळ्या सामाजिक, आर्थिक क्रीडावियषक बातम्या आणप मनापासून वाचतो तरीपण राजकीय बातम्या राजराकणातले हेवेदावे हे मात्र अधिचक मनापानूस चौकसणपे वाचत असतो.
.
.
.
.
.
परत वाचून किती शब्द चुकीचे वाचले ते मोजा
सुख म्हणजे नक्की काय असत.....
सुख म्हणजे नक्की काय असत.................
ताप नाही
खोकला नाही
कसकस नाही.
९५ च्या वर ऑक्सिजन लेव्हल आहे.
चव आणि वास येतोय.
अजुन काय हवे???
चीन मध्ये ABP माझा वर बंदी
चीन मध्ये ABP माझा वर बंदी
.
.
.
सारखं म्हणत्यात
उघडा डोळे.... बघा नीट
शेतकरी तितुका एक एक!
या आठवड्यात तुमच्या
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे असे काही भाकित केलेले असल्यास .........
उगीच स्वतःच्या कर्तृत्वावर खुष होऊ नका........
तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळी काढण्याचा योग आहे!
दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा
BABA
BABA
भक्त : - बाबा, मी चांगला शिकलेलो आहे. पण तरीही नोकरी नाही मिळत. लग्नासाठी छोकरी नाही मिळत. काय करू ?
बाबा : - किती शिकलास ?
भक्त : - बाबा, मी BA केलंय.
बाबा : - आणखी एकदा BA कर. दोनदा BA केल्यावर BABA बनशील. भरपूर पैसे कमवशील. मग नको म्हणशील नोकऱ्या. तुझ्यासाठी रांगा लावतील छोकऱ्या.
- महान चव्हाण
:)))
MAHAAN CHAVAN
ha ha ha
शेतकरी तितुका एक एक!
पत्नी:- कोठे निघालात?
११९० मध्ये मुली घाबरायच्या की
११९० मध्ये मुली घाबरायच्या की लग्नानंतर सासू कशी मिळेल.
आणि
२०२३ मध्ये सासू घाबरते की सून कशी मिळेल.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की, १९९० मध्ये ज्या मुली घाबरत होत्या त्या आजही घाबरत आहे.
आज मी दोनशेकोटींचा मालक आहे.
आज मी दोनशेकोटींचा मालक आहे.
(एक अंगणात तर दुसरी गच्चीवर पेटवली आहे)
मी काॅलेजला असताना ज्योतिषाने
मी काॅलेजला असताना ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढं काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल, आणि मग तू याला दे, त्याला दे करीत वाटत सुटशील. जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल. तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही.
हे भविष्य ऐकून मला आनंद झाला.....
अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी whatsapp बद्दल बोलत होता.
अच्छा हुआ मरने के बाद कोई
अच्छा हुआ मरने के बाद कोई मोबाइल साथ लेकर नहीं ले जाते..
नहीं तो ऊपर पहुंचते ही स्टेटस लगाते ...
आज यमराज जी का सानिध्य प्राप्त हुआ और पृथ्वी के गहन मुद्दों पर चर्चा की।
पत्नी:- कोठे निघालात?
पत्नी:- कोठे निघालात?
पती:- हॉटेलमध्ये. फुटबॉलची मॅच टीव्ही वर बघायला.
पत्नी:- माझ्याबरोबर का मॅच पहात नाही?
पती:- मला मित्रांबरोबर मॅच बघायची आहे.
पत्नी:- म्हणजे मी तुमच्यासाठी कोणीच नाही का?
पती:- अरे देवा..! ओके, ओके, मी घरीच थांबतो.
पत्नी:- तो गोलकीपर एकटाच का काळ्या ड्रेसमध्ये आहे?
पती:- त्याच्या आईचे निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यासाठी.
पत्नी:- त्या कॉमेंट्रेटरला सगळ्या खेळाडूंची नावे कशी लक्षात राहतात?
पती:- त्याचा तोच जॉब आहे.
पत्नी:- अरे व्वा, गोल..!मस्त... हे,हे,हे .. गोल झाला.
पती:- नाही, दिला नाही गोल. ती ऑफ साइड होती.
पत्नी:- ऑफ साइड म्हणजे काय असते?
पती:- नाही, तो गोलच आहे. मी विनोदाने बोललो.
पत्नी :- ओके. पण ऑफसाइड काय असते?
पती:- ऑफसाइड हे त्या टीमच्या कोचचे नाव आहे.
पत्नी:- पण कोच कोठे आहे?
पती:- तो मैदानाच्या बाहेर बसलेला आहे.
पत्नी:- मग तो का खेळत नाही?
पती:- नाही, कोच कधी मॅचमध्ये खेळत नसतो. मैदानाबाहेरून तो खेळाडूंना सूचना करतो. त्यांच्यात चेंजेस करतो.
पत्नी:- मला सांगा, मॅराडोना आहे का या मॅचमध्ये?
पती:- नाही. त्याच निधन झालय.
पत्नी:- ओ, माय गॉड. कशाने गेला तो ?
पती:- त्याच्या बायकोबरोबर तो फुटबॉल मॅच बघत होता.
बीवी ने रोते हुए पति को उठाया
बीवी ने रोते हुए पति को उठाया
इस वाक्य में रो कौन रहा है?
तुम्हाला हिंदी येत असेल तर
तुम्हाला हिंदी येत असेल तर खालील मराठी वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करून दाखवा.
माझ्याकडे पाठवलंच नाही. पाठवलं असतं तर चांगलं झालं असतं.
सरलाताई खूप हसतमुख होत्या.
सरलाताई खूप हसतमुख होत्या. त्यांचा नवरा मात्र कायम गंभीर चेहऱ्यानं वावरायचा. मैत्रिणीनं विचारलं, 'काय गं कसं जमतं तुमचं?'
.
.
.
.
.
.
सरलाताई म्हणाल्या, 'लग्नकार्य वास्तूशांतीसारख्या प्रसंगी मी जाते. कोणी आजारी किंवा गेलं असेल तर हे जातात.'
*मुंबईकर* :
*मुंबईकर* :
मी अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय...
*पुणेकर* :
छान
मग...?
खाजवल्यावर वाजते का ?
मी माझ्या स्वतःच्या 3 मोबाईल
मी माझ्या स्वतःच्या 3 मोबाईल नंबरचा एक व्हॉट्सॲप गृप बनवलाय.
कधी समविचारी लोकांशी चर्चा करावीशी वाटली तर तो गृप बरा पडतो.
पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर
पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर राहून घराला हॉस्पिटल नका बनवू. आपल्याला असं वाटतं की, चिडल्याशिवाय, रागवल्याशिवाय आपलं कोणी ऐकणारच नाही. आपण जरी चिडलो तरी लोक मात्र हसायला हवेत आणि आपलं ऐकायलाही हवेत. ही किमया पु.ल. करतात. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा.
"एकदा मी पुण्याहून कोल्हापूरला एस.टी. ने जायला निघालो. जवळपास एक तासाने थांब्यावर बस थांबली. एक ग्रामीण महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन बस मधे शिरली आणि नेमकी माझ्यासमोर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही सीट्स खिडकी जवळच होत्या. बस सुरू झाली. अर्धा तास झाल्यानंतर तिचं लहान मूल रडायला लागलं. लेकराला सू लागली असावी म्हणून तिने त्याला बाजूलाच सीट खाली उभ केलं आणि त्याला सू s s s सू ss सू ss असं म्हणू लागली. मी माझं पुस्तक वाचण्यात रमलो होतो. पण तिचा तो जप सुरू झाल्याने मी थोडा विचलित झालो. आता पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण त्या बाईचे पोराला सू ss म्हणणं थांबेना आणि ते पोर सू काही करेना. मी आता खूप डिस्टर्ब झालो आणि त्या बाईवर जवळ जवळ ओरडलोच आणि म्हणालो, *"अहो बाई आता हे बंद करा, आता परिणाम माझ्यावर व्हायची वेळ आली आहे."*
हे ऐकल्याबरोबर कंडक्टर, ड्राइव्हर सह पूर्ण बस हास्य कल्लोळात न्हाऊन निघाली. ताबडतोब बस थांबली. बाई आपल्या बाळाला बाहेर नेऊन त्याला शांत करून पुन्हा माझ्यासमोर येऊन बसली. ते छोट बाळ आणि त्याची आई माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसले... आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा संपूर्ण बस मस्त हसत होती.
स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा आणि व्यस्त रहा...
तिला ते स्थळ सांगून आलं,
नवरा आणि बायको दोघेही अपघातात
नवरा आणि बायको दोघेही अपघातात वारले…
नवरा भूत बनला आणि बायको चेटकीण
काही दिवसांनंतर दोघे पुन्हा भेटले
बायको - किती वेगळे वाटता भूत बनल्यानंतर…
नवरा - पण तू अजिबात बदलली नाहीस…
जत्रेत पाळण्यामधे बसल्यावर
जत्रेत पाळण्यामधे बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा ऊपाय...
जाताना दोन-तीन नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे.
राऊंड सुरु होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं
तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले…?
तिकडूनच उडून आले…
माझ्या नावाने फेक खाते कोणी
माझ्या नावाने फेक खाते कोणी बनवत नाही. त्यांना माहित्येय की माझे FB फ्रेंडस नवा पैसाही कुणाला देत नाहीत.
#शुभरात्री_लोक्सहो © गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
देवाला माणसाच्या भावनेची कदर
तिला ते स्थळ सांगून आलं,
वर्गात भुगोलाचा तास चालू होता
जत्रेत पाळण्यामधे बसल्यावर
कर्मचारी - सर, मला सुट्टी
कर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय.
मॅनेजर - (रागानं) सुट्टी? कशाला हवीय?
कर्मचारी - काही नाही सर, एकदा घेऊन तर बघतो कशी असते ती.
पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर
पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर राहून घराला हॉस्पिटल नका बनवू. आपल्याला असं वाटतं की, चिडल्याशिवाय, रागवल्याशिवाय आपलं कोणी ऐकणारच नाही. आपण जरी चिडलो तरी लोक मात्र हसायला हवेत आणि आपलं ऐकायलाही हवेत. ही किमया पु.ल. करतात. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा.*
"एकदा मी पुण्याहून कोल्हापूरला एस.टी. ने जायला निघालो. जवळपास एक तासाने थांब्यावर बस थांबली. एक ग्रामीण महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन बस मधे शिरली आणि नेमकी माझ्यासमोर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही सीट्स खिडकी जवळच होत्या. बस सुरू झाली. अर्धा तास झाल्यानंतर तिचं लहान मूल रडायला लागलं. लेकराला सू लागली असावी म्हणून तिने त्याला बाजूलाच सीट खाली उभ केलं आणि त्याला सू s s s सू ss सू ss असं म्हणू लागली. मी माझं पुस्तक वाचण्यात रमलो होतो. पण तिचा तो जप सुरू झाल्याने मी थोडा विचलित झालो. आता पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण त्या बाईचे पोराला सू ss म्हणणं थांबेना आणि ते पोर सू काही करेना. मी आता खूप डिस्टर्ब झालो आणि त्या बाईवर जवळ जवळ ओरडलोच आणि म्हणालो, *"अहो बाई आता हे बंद करा, आता परिणाम माझ्यावर व्हायची वेळ आली आहे."*
हे ऐकल्याबरोबर कंडक्टर, ड्राइव्हर सह पूर्ण बस हास्य कल्लोळात न्हाऊन निघाली. ताबडतोब बस थांबली. बाई आपल्या बाळाला बाहेर नेऊन त्याला शांत करून पुन्हा माझ्यासमोर येऊन बसली. ते छोट बाळ आणि त्याची आई माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसले... आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा संपूर्ण बस मस्त हसत होती.
*स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा आणि व्यस्त रहा...*
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला
एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"
-
-
-
थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!!
पत्नी :-
"अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!l
मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन् तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!
एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???
अरे देवा...!!
कसं होईल या संसाराचं...???
काय म्हणावं या माणसाला....??
बाई बाई बाई ...!!!!
मी म्हणून संसार करत राहिले...!!
मुस्कटदाबी सहन करून..!!!
जळला मेला बायकांचा जन्म...!!
देवाला रोज सांगते - देवा ! पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!
देवा पांडुरंगा...!!"
पती - "अग अग किती किंचाळतेस...??
तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!
तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!
तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"
तात्पर्य .... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!
एका कार्यक्रमात नवऱ्याला एक
एका कार्यक्रमात नवऱ्याला एक प्रश्न विचारला,
तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण झालं...
आणि तिने तुमच्याशी बोलणं बंद केले तर तुम्ही काय करता????
मी सरळ किचन मध्ये जातो...
आणि सर्व बरण्यांची झाकणं घट्ट बंद करून येतो...
थोड्या वेळाने आवाज येतो..
अहो, त्या बिछान्यावर लोळत काय पडलात...
इकडे या हे बघा,
ह्या बरणीचे झाकणं उघडत नाही ......
नवऱ्याला तिळगुळ देणे
नवऱ्याला तिळगुळ देणे ही *श्रद्धा* आहे! अन तो गोड बोलेल ही *अंधश्रद्धा* आहे. ही झाली विनोद निर्मिती. पण वरील वाक्यात नवऱ्या ऐवजी बायको शब्द लिहिला की वाक्यातला विनोद झोपी जातो आणि एक धीरगंभीर भयाण वास्तविक वाक्य तयार होते.
मोदींचे कौतुक किंवा विरोध
शेतकरी तितुका एक एक!
शाळेत असताना टीचर कडून
एका ऑफिसमध्ये इंटरव्यू सुरू
ग्राहक – हा कुत्रा विश्वासू
ग्राहक – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?
विक्रेता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे
की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो
जेंव्हा कधी मला आयुष्यात
जेंव्हा कधी मला आयुष्यात डिप्रेस्ड वाटतं...
मी माझं Gmail Inbox ओपन करून बसतो.
मग मला कळतं -
१) ६ बँका मला इजी लोन द्यायला तयार आहेत.
.
२) १०/१५ बँका मला प्री अप्रुव्हड क्रेडिट कार्ड देण्यास उत्सुक आहेत
.
३) मी $१०००००० जिंकलोय, कारण माहित नाही.
.
४) ८-१० कंपन्यांकडे माझ्यासाठी बेस्ट जॉब आहे.
.
५) डॉ.बत्रा माझं हेअर फॉल थांबवण्याचा दावा करतात.
.
६) ५-६ युनिव्हर्सिटी मला कुठल्यातरी सब्जेक्ट मध्ये डिग्री द्यायला रेडी आहेत.
.
७) रिया, नेहा आणि पायल यांना एकाकी वाटतय आणि त्यांना मला भेटायची तीव्र इच्छा आहे,
.
अशा साधारण २०-२५ मेल्स आहेत.
.
साला... आयुष्यात अजून काय पाहिजे?