नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रानातल्या पावसा तू ये
डोंगरदऱ्यातून नदी नाल्यातून l
रानावनातून झाडाझुडपातून ll
कर चिंब ओले बळीराजाला. l
पशुपक्ष्यांना अन शेतमाऊलीला ll
रानातल्या पावसा तू ये
दरवळू दे सुगंध मातीचा. l
आगमन तुझे उत्सव सृष्टीचा ll
बळीराजाला पेरणी करू दे l
पिके शेतात डोलू दे ll
रानातल्यापावसा तू ये.
मोराला नाचू दे पक्षांना गाऊ दे.l
वृक्षवेलींना ही डोलू दे. ll
पण नको करू नासाडी पिकाची l
नदीच्या पुराने कुणा जीवाची ll
रानातल्या पावसा तू ये
पण नको होऊस नकोसा l
बळीराजा होईल वेडापिसा ll
भरुदे त्याचा खिसा l
रे रानातल्या पावसा ll
पावसा तू ये.
जेव्हा माझी सखी असेल शेतात l
तिचा हात असेल माझ्या हातात ll
तेव्हा कर चिंब ओले तिला l
मग मीच असेल तिच्या मदतीला ll
रचना.
विनायक अंगाईतकर
प्रतिक्रिया
Environmental
On environmental poem
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने