येणार नाही करता मला या वर्षाला ठसक्यात शेती.
गेली गुदस्ता कर्जात माझी वाण्याच्या नरड्यात शेती.
बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती.
सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती.
शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा,
असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती.
'करणार हलके ओझे ऋणाचे' केले मज वादे कशाला ?
गेली न आता आशेमुळे मम कर्जाच्या बोज्यात शेती !
सरकारने या म्हटले असे की आमदनी होईल दुप्पट,
उलटा परंतू घाटाच झाला गेली अन तोट्यात शेती.
लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा,
लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती.
बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण,
आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती.
विषयी बळी या देशात हळहळ वरपांगी असुनी दिखाऊ,
आहेत शामिल सारे खरे तर आता ही छळण्यात शेती.
देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम,
पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती.
'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर,
देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ?
• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.
• अक्षर गणवृत्त •
(स्वानंदसम्राट + शेतकरी)
• लगावली •
गागालगागा गागालगागा + गागागा गागालगागा
प्रतिक्रिया
Super
Super
धन्यवाद साहेब!
रंगनाथ तालवटकरजी, नमस्कार! खुप खुप आभारी आहे मी आपला.
Dr. Ravipal Bharshankar
अप्रतिम रचना
अप्रतिम रचना
कृषीपुत्र
धन्यवाद!
डॉ. ब्रम्हदेव खिल्लारेजी, नमस्कार! अत्यंत आभारी आहे आपला.
Dr. Ravipal Bharshankar
गझलेचा प्रत्येक शेर
गझलेचा प्रत्येक शेर लेखनस्पर्धेच्या विषयाला जिवंत ठेवतो आणि व्रुत्त नवीन असल्यामुळे नाविन्याचे marksही गझलेला जाते.Best रचना सर.
धन्यवाद राजेश!
हो, वृत्त नवीन आहे. याचे नाव मी 'स्वानंदसम्राट शेतकरी' अशे ठेवले आहे. कारण यातील प्रथम दोन गण गागालगागा गागालगागा हे स्वानंदसम्राट वृत्त असुन. त्यापूढील दोन गण 'गागागा गागालगागा' हे मी मुटे सरांनी दिलेला विषय, 'कर्जाच्या विळख्यात शेती' यावरुन त्यास जोडले.
करता पूर्ण वृत्त ~ गागालगागा गागालगागा गागागा गागालगागा असे झाले आहे. गागागा वरून शेतकरी हे नाव जोडले. म्हणून हे वृत्त 'स्वानंदसम्राट शेतकरी' असे झाले.
या गज़लेतील, पैशाचा पाऊस पाडा हा जो शेर आहे तो अतिशय नवीन खयालाचा आहे. मतला विषयानुरूप, तर इतर शेरही सुंदर झाले आहेत.
परंतु गजलेत जी सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे "बहर किंवा वृत्त सांभाळणे ही होय. परंतु वृत किंवा बहर हे 'गण' या घटकाने बनले आहे हे सत्य मात्र गजलकार कधी लक्षातच घेत नाहीत. ते वृत्ताला केवळ ऱ्हस्व दिर्घ मात्रांचा क्रम समजून त्याचा वापर करतात, जे की अत्यंत चुकीचे आहे.
या गज़लेत मात्र मी फक्त एक जागा वगळता कुठेही गणभंग केलेला नाही. आणि ती जी एक जागा गणभंग केली तीही जाणून, कारण गोरे गोरे गाल पे एक तो भी काला तील जरूरी होता है करके! पण त्याची जागाही तेवढीच खुलून दिसणारी हवी बर का. असो,
मी ही जी एक जागा गणभंग केली, ती 'विळख्यात सापडणे' हा मुहावरा जसाच्या तसा वापरण्याकरता. मुहावऱ्यांच्या वापरास गजलेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याशिवाय आशय लोंकाच्या कानी सहज उतरत नाही. बरेचदा गणभंग न करता मुहावरे चालून जातात, पण काहीकेल्या जमत नसल्यास अगदी शेवटचा उपाय म्हणून गणभंग केल्यास हरकत नाही कारण पूर्ण गजलेत अशी फक्त एक दोनच जागा असू शकेल. परंतु मुहावरा म्हणजे म्हणी नव्हेत बरं का! तर मुहावरा म्हणजे, जसे~ कर्जाच्या विळख्यात, कापून काढणे, आरामात बसणे, चिंतन करणे, रागाच्या सपाट्यात, ई. तोंडी पडलेले शब्द प्रयोग होत.
आता अखेरचे म्हणजे मला ही गजल तयार करायला जवळ जवळ १५ दिवस लागले. तरीपण काही उणीवा संभवू शकतात. तशा त्या मी स्पर्धेच्या अंतिम दिवसापर्यंत दुरूस्त करत राहणार आहे. तर एवढी मेहनत असते म्हणजे.
गज़ल तुला आवडली राजेश, यास्तव तुझे खुप खुप आभार मानतो. धन्यवाद
Dr. Ravipal Bharshankar
राजेश!
Completely final केलेली ही गज़ल बघ आता.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
राजेश
Dr. Ravipal Bharshankar
कर्जाच्या विळख्यात शेती
जबरदस्त गझल डॉ साहब!
शेतात माझ्या थोडातरी या पैश्याचा पाऊस पाडा
असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती
मस्त जबरदस्त अप्रतिम शेर..... डॉ साहेब....
धन्यवाद भाऊ!
धीरजभाऊ गुरूजी खुप खुप आभार आहे आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर!
आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
शिर्षक बदलून घेतल्या बद्दल.
सर, नमस्कार!
आपण सुचवल्या प्रमाणे गज़लेचे शिर्षक बदलून घेतले आहे. धन्यवाद.
Dr. Ravipal Bharshankar
फारच छान डाॅ साहेब
फारच छान डाॅ साहेब
धन्यवाद प्रदिपजी!
खूप खूप आभार!
Dr. Ravipal Bharshankar
प्रदीप भाऊ..
तुम्ही प्रवेशिका कधी सादर करणार!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
Dr. Ravipal Bharshankar
भन्नाट गझल डॉक्टर साहेब
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नावीन्यपूर्ण विषय आशय आणि वृत्त आपल्याकडून वाचायला मिळाले....अप्रतिम
R.A.Burbure
धन्यवाद रमेश!
Thank you so much Ramesh!
Dr. Ravipal Bharshankar
घाट्याच्या सौद्यात शेती
दमदार आशयघन रचना ..डॉ साहेब
भेटूयात
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद!
खूप खूप आभार दळवीजी
Dr. Ravipal Bharshankar
बहुत बढीया
एक नंबर गझल. अप्रतिम
Narendra Gandhare
धन्यवाद
खूप खूप आभार नरेंद्र भाऊ
Dr. Ravipal Bharshankar
हृदयातून आभार
डाॅ साहेब मस्त गझल
हृदयातून धन्यवाद गांधीजी
आवडल्या बद्दल आभार
Dr. Ravipal Bharshankar
पाने