Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 11:56 AM IST, शुक्र September 06, 2019
गझल

घाट्याच्या सौद्यात शेती

विश्वलेखन स्पर्धेत सादर केलेली गज़ल - २०१९

येणार नाही करता मला या वर्षाला ठसक्यात शेती.
गेली गुदस्ता कर्जात माझी वाण्याच्या नरड्यात शेती.

बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती.
सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती.

शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा,
असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती.

'करणार हलके ओझे ऋणाचे' केले मज वादे कशाला ?
गेली न आता आशेमुळे मम कर्जाच्या बोज्यात शेती !

सरकारने या म्हटले असे की आमदनी होईल दुप्पट,
उलटा परंतू घाटाच झाला गेली अन तोट्यात शेती.

लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा,
लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती.

बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण,
आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती.

विषयी बळी या देशात हळहळ वरपांगी असुनी दिखाऊ,
आहेत शामिल सारे खरे तर आता ही छळण्यात शेती.

देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम,
पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती.

'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर,
देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ?


• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.

• अक्षर गणवृत्त •
(स्वानंदसम्राट + शेतकरी)

• लगावली •
गागालगागा गागालगागा + गागागा गागालगागा

बघितल्या बद्दल धन्यवाद !
मराठी गझल
Super

RANGNATH TALWATKAR

शुक्रवार, September 6, 2019 - 14:19
Permalink
New

Super

  • Log in or register to post comments
धन्यवाद साहेब!

Dr. Ravipal Bh…

सोमवार, September 30, 2019 - 19:26
Permalink
New

रंगनाथ तालवटकरजी, नमस्कार! खुप खुप आभारी आहे मी आपला.

  • Log in or register to post comments

In reply to Super by RANGNATH TALWATKAR

अप्रतिम रचना

Khillare bramhadev

शुक्रवार, September 6, 2019 - 15:07
Permalink
New

अप्रतिम रचना

  • Log in or register to post comments
धन्यवाद!

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 15, 2019 - 23:37
Permalink
New

डॉ. ब्रम्हदेव खिल्लारेजी, नमस्कार! अत्यंत आभारी आहे आपला.

  • Log in or register to post comments

In reply to अप्रतिम रचना by Khillare bramhadev

गझलेचा प्रत्येक शेर

Rajesh Jaunjal

शुक्रवार, September 6, 2019 - 20:05
Permalink
New

गझलेचा प्रत्येक शेर लेखनस्पर्धेच्या विषयाला जिवंत ठेवतो आणि व्रुत्त नवीन असल्यामुळे नाविन्याचे marksही गझलेला जाते.Best रचना सर.

  • Log in or register to post comments
धन्यवाद राजेश!

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 1, 2019 - 20:08
Permalink
New

हो, वृत्त नवीन आहे. याचे नाव मी 'स्वानंदसम्राट शेतकरी' अशे ठेवले आहे. कारण यातील प्रथम दोन गण गागालगागा गागालगागा हे स्वानंदसम्राट वृत्त असुन. त्यापूढील दोन गण 'गागागा गागालगागा' हे मी मुटे सरांनी दिलेला विषय, 'कर्जाच्या विळख्यात शेती' यावरुन त्यास जोडले.
करता पूर्ण वृत्त ~ गागालगागा गागालगागा गागागा गागालगागा असे झाले आहे. गागागा वरून शेतकरी हे नाव जोडले. म्हणून हे वृत्त 'स्वानंदसम्राट शेतकरी' असे झाले.

या गज़लेतील, पैशाचा पाऊस पाडा हा जो शेर आहे तो अतिशय नवीन खयालाचा आहे. मतला विषयानुरूप, तर इतर शेरही सुंदर झाले आहेत.

परंतु गजलेत जी सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे "बहर किंवा वृत्त सांभाळणे ही होय. परंतु वृत किंवा बहर हे 'गण' या घटकाने बनले आहे हे सत्य मात्र गजलकार कधी लक्षातच घेत नाहीत. ते वृत्ताला केवळ ऱ्हस्व दिर्घ मात्रांचा क्रम समजून त्याचा वापर करतात, जे की अत्यंत चुकीचे आहे.

या गज़लेत मात्र मी फक्त एक जागा वगळता कुठेही गणभंग केलेला नाही. आणि ती जी एक जागा गणभंग केली तीही जाणून, कारण गोरे गोरे गाल पे एक तो भी काला तील जरूरी होता है करके! पण त्याची जागाही तेवढीच खुलून दिसणारी हवी बर का. असो,

मी ही जी एक जागा गणभंग केली, ती 'विळख्यात सापडणे' हा मुहावरा जसाच्या तसा वापरण्याकरता. मुहावऱ्यांच्या वापरास गजलेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याशिवाय आशय लोंकाच्या कानी सहज उतरत नाही. बरेचदा गणभंग न करता मुहावरे चालून जातात, पण काहीकेल्या जमत नसल्यास अगदी शेवटचा उपाय म्हणून गणभंग केल्यास हरकत नाही कारण पूर्ण गजलेत अशी फक्त एक दोनच जागा असू शकेल. परंतु मुहावरा म्हणजे म्हणी नव्हेत बरं का! तर मुहावरा म्हणजे, जसे~ कर्जाच्या विळख्यात, कापून काढणे, आरामात बसणे, चिंतन करणे, रागाच्या सपाट्यात, ई. तोंडी पडलेले शब्द प्रयोग होत.
आता अखेरचे म्हणजे मला ही गजल तयार करायला जवळ जवळ १५ दिवस लागले. तरीपण काही उणीवा संभवू शकतात. तशा त्या मी स्पर्धेच्या अंतिम दिवसापर्यंत दुरूस्त करत राहणार आहे. तर एवढी मेहनत असते म्हणजे.

गज़ल तुला आवडली राजेश, यास्तव तुझे खुप खुप आभार मानतो. धन्यवाद

  • Log in or register to post comments

In reply to गझलेचा प्रत्येक शेर by Rajesh Jaunjal

राजेश!

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 8, 2019 - 11:29
Permalink
New

Completely final केलेली ही गज़ल बघ आता.

  • Log in or register to post comments

In reply to धन्यवाद राजेश! by Dr. Ravipal Bh…

धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

बुधवार, October 2, 2019 - 16:14
Permalink
New

राजेश

  • Log in or register to post comments

In reply to राजेश! by Dr. Ravipal Bh…

कर्जाच्या विळख्यात शेती

Dhirajkumar Taksande

बुधवार, October 2, 2019 - 14:39
Permalink
New

जबरदस्त गझल डॉ साहब!
शेतात माझ्या थोडातरी या पैश्याचा पाऊस पाडा
असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती
मस्त जबरदस्त अप्रतिम शेर..... डॉ साहेब....

  • Log in or register to post comments
धन्यवाद भाऊ!

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 8, 2019 - 19:08
Permalink
New

धीरजभाऊ गुरूजी खुप खुप आभार आहे आपले.

  • Log in or register to post comments

In reply to कर्जाच्या विळख्यात शेती by Dhirajkumar Taksande

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

रवीवार, September 8, 2019 - 15:08
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
धन्यवाद सर!

Dr. Ravipal Bh…

रवीवार, September 8, 2019 - 22:19
Permalink
New

आभार आपले.

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. by गंगाधर मुटे

शिर्षक बदलून घेतल्या बद्दल.

Dr. Ravipal Bh…

सोमवार, September 16, 2019 - 10:35
Permalink
New

सर, नमस्कार!
आपण सुचवल्या प्रमाणे गज़लेचे शिर्षक बदलून घेतले आहे. धन्यवाद.

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. by गंगाधर मुटे

फारच छान डाॅ साहेब

Pradip thool

मंगळवार, September 10, 2019 - 20:55
Permalink
New

फारच छान डाॅ साहेब

  • Log in or register to post comments
धन्यवाद प्रदिपजी!

Dr. Ravipal Bh…

शनीवार, October 12, 2019 - 13:50
Permalink
New

खूप खूप आभार!

  • Log in or register to post comments

In reply to फारच छान डाॅ साहेब by Pradip thool

प्रदीप भाऊ..

Dr. Ravipal Bh…

सोमवार, October 7, 2019 - 22:13
Permalink
New

तुम्ही प्रवेशिका कधी सादर करणार!

  • Log in or register to post comments

In reply to फारच छान डाॅ साहेब by Pradip thool

धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 8, 2019 - 19:17
Permalink
New

*bq*

  • Log in or register to post comments

In reply to फारच छान डाॅ साहेब by Pradip thool

भन्नाट गझल डॉक्टर साहेब

Ramesh Burbure

शनीवार, September 14, 2019 - 20:54
Permalink
New

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नावीन्यपूर्ण विषय आशय आणि वृत्त आपल्याकडून वाचायला मिळाले....अप्रतिम

  • Log in or register to post comments
धन्यवाद रमेश!

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 15, 2019 - 22:14
Permalink
New

Thank you so much Ramesh! *bq*

  • Log in or register to post comments

In reply to भन्नाट गझल डॉक्टर साहेब by Ramesh Burbure

घाट्याच्या सौद्यात शेती

ravindradalvi

बुधवार, October 9, 2019 - 12:07
Permalink
New

दमदार आशयघन रचना ..डॉ साहेब
भेटूयात

  • Log in or register to post comments
धन्यवाद!

Dr. Ravipal Bh…

गुरुवार, October 10, 2019 - 18:21
Permalink
New

खूप खूप आभार दळवीजी *bq*

  • Log in or register to post comments

In reply to घाट्याच्या सौद्यात शेती by ravindradalvi

बहुत बढीया

Narendra Gandhare

गुरुवार, October 10, 2019 - 16:28
Permalink
New

एक नंबर गझल. अप्रतिम *bq*

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

शनीवार, October 12, 2019 - 13:51
Permalink
New

खूप खूप आभार नरेंद्र भाऊ *bq*

  • Log in or register to post comments

In reply to बहुत बढीया by Narendra Gandhare

हृदयातून आभार

Pradip thool

बुधवार, October 16, 2019 - 01:30
Permalink
New

डाॅ साहेब मस्त गझल

  • Log in or register to post comments
हृदयातून धन्यवाद गांधीजी

Dr. Ravipal Bh…

मंगळवार, October 22, 2019 - 17:08
Permalink
New

आवडल्या बद्दल आभार *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to हृदयातून आभार by Pradip thool

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 20909 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,274 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,169 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,230 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,009 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,487 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,375 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,206 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,835 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,102 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,997 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,109 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,236 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,636 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,971 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,264 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,364 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,622 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,433 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 130 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    3 hours 12 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    3 hours 55 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    16 hours 45 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 8 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 8 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 398
आजचे शेतमालाचे बाजारभाव 146
किती चाटणार भारतपुत्रा? 142
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 138
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 134
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 132
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 131
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 127
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 123
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 99
कापला रेशमाच्या सुताने गळा 95
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 68
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 50
माझे फेसबूक स्टेटस-1 45
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 33
किसान क्रांती 30
काही सुटे अन काही मुटे शेर 27
माझे फेसबूक स्टेटस - 2 24
मातृत्वाचा शृंगाररस 21
गणपतीची आरती ॥३५॥ 18
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,004
माझे फेसबूक स्टेटस-1 180,961
शुभारंभ 134,910
रानमेवा - भूमिका 109,386
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,394
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,434
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,541
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,808
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,579
उद्देश आणि भूमिका 77,442
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,533
विचारपूस 71,717
गणपतीची आरती ॥३५॥ 67,731
सत्कार समारंभ : वर्धा 66,732
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,304
किती चाटणार भारतपुत्रा? 61,678
जात्यावरची गाणी 56,012
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,418
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,045
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,348
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini