Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




३ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, गडचिरोली : कार्यक्रमपत्रिका

लोगो तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत
संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते
उद्घाटक : डॉ. अभय बंग
प्रमुख अतिथी : मा. डॉ. किशोर सानप, ज्येष्ठ समीक्षक
विशेष अतिथी : मा.संजय पानसे, कृषि अर्थतज्ज्ञ
विशेष अतिथी : मा.सौ. योगिताताई पिपरे, नगराध्यक्ष
दिनांक : २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७
स्थळ : संस्कृती सांस्कृतिक सभागृह, गडचिरोली

कार्यक्रम- विषय पत्रिका

नमस्कार,
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेती-साहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्य- विश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्या-साठी आणि मराठी साहित्यविश्वाकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी दोन दिवसाचे तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
       या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता सारस्वतांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
 
कार्यक्रमाची रुपरेषा
शनिवार २५ फ़ेब्रुवारी २०१७
 
सकाळी १०.०० ते ०११.००   : प्रतिनिधी नोंदणी
सकाळी ११.०० ते ०१.३० : उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, 
उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. डॉ.प्रा. शेषराव मोहिते, ज्येष्ठ साहित्यिक
उदघाटक : मा. डॉ. अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक
प्रमुख अतिथी : मा. डॉ. किशोर सानप, ज्येष्ठ समीक्षक
विशेष अतिथी : मा. संजय पानसे, कृषि अर्थतज्ज्ञ
विशेष अतिथी : मा. सौ. योगिताताई पिपरे, नगराध्यक्ष
स्वागताध्यक्ष : मा. शालिक पाटील नाकाडे
प्रास्ताविक : मा. श्री. गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनिषा रिठे
 
पुस्तक प्रकाशन
१)  “आम्ही लटिके ना बोलू” या तिसर्‍या मराठी साहित्य संमेलन विशेषांकाचे 
मा. डॉ. प्रा. शेषराव मोहिते यांचे हस्ते प्रकाशन 
२)  “कणसातली माणसं” शेतकरी प्रातिनिधीक काव्यसंग्रहाच्या ई पुस्तकाचे 
मा. डॉ. अभय बंग यांचे हस्ते प्रकाशन
३)  “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाच्या तिसर्‍या आवृत्तीचे  
डॉ. किशोर सानप यांचे हस्ते प्रकाशन
 
दुपारी ०१.३० ते ०२.३० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
 
सत्र - २ : दुपारी ०२.३० ते ०४.३० : शेतकरी गझल मुशायरा 
 
अध्यक्ष    : मा. राज पठाण (बीड)
सूत्रसंचालन : मा. नितिन देशमुख (अमरावती)
सहभाग : दर्शन शहा (हैद्राबाद), दिवाकर चौकेकर (गुजरात), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर),
विशाल राजगुरु (मुंबई), प्रा. अशोक बागवे, जनार्दन म्हात्रे (ठाणे), डॉ. अविनाश सांगोलेकर, प्राजक्ता पटवर्धन (पुणे), विनिता कुलकर्णी (लातूर), हंसिनी उचित (वाशिम), विरेंद्र बेडसे (धुळे), विजय पाटील (नंदूरबार), गोपाल मापारी, नजीम खान, जयदीप विघ्ने (बुलडाणा), शरद धनगर (जळगांव), निलेश कवडे, प्रवीण हटकर, ईश्वर मते (अकोला), संघमित्रा खंडारे (अमरावती), विनय मिरासे (यवतमाळ), रमेश सरकाटे (नागपूर), गंगाधर मुटे (वर्धा), प्रा.राजेश देवाळकर, रवी धारणे, रामकृष्ण रोगे (चंद्रपूर), सुरेश शेंडे, मिलिंद उमरे रोशनकुमार पिलेवान (गडचिरोली)
 
सत्र - ३ :  सायं ०४.३० ते ०५.४५ : परिसंवाद – १
विषय : भारतीय शेतीची पराधिनता 
 
अध्यक्ष : मा. सौ.सरोजताई काशीकर (वर्धा)
सहभाग : मा. प्रभाकरराव दिवे (चंद्रपूर), मा. संजय कोले (सांगली)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. सौ. गीता खांडेभराड (जालना)
 
मध्यावकाश : चहा
 
सत्र - ४ :  सायं ०६.०० ते ०७.०० : परिसंवाद – २
विषय – स्वामिनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था
 
अध्यक्ष : मा. श्री  गुणवंत पाटील (नांदेड)
सहभाग : मा. ललित बहाळे (अकोला), मा. विजय निवल (यवतमाळ) 
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. श्री सतिश दाणी (वर्धा)
 
सत्र - ५ :  रात्री ०७.०० ते ८.०० :  परिसंवाद – ३
विषय – शेतकरी विरोधी कायद्यांचा परिचय
 
अध्यक्ष : मा. अ‍ॅड दिनेश शर्मा, (वर्धा) 
सहभाग : मा. अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील, (औरंगाबाद)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. मधुसुदन हरणे, (हिंगणघाट)
 
सत्र - ६:  रात्री ०८.०० ते ९.०० :  शेतकरी कवी संमेलन-१
अध्यक्ष : मा. राधाबाई कांबळे (बीड)
सूत्रसंचालन : अविनाश पोईनकर (चंद्रपूर)
सहभाग : रविंद्र कामठे, मुक्ता भुजबळ (पुणे), वृषाली पाटील (लातूर), प्रज्ञा आपेगांवकर (बीड),  विजय विल्हेकर  (अमरावती), चंद्रकुमार बहेकार, राजेश हजारे (गोंदिया), दामोधर जराहे (नागपूर), अतुल कुडवे (यवतमाळ), श्रीकांत धोटे, आशिष वरघणे, प्रदीप थूल, राजेश जवंजाळ, डॉ. रविपाल भारशंकर (वर्धा), किशोर मुगल, विजय वाटेकर, चंदू झुरमुरे  (चंद्रपूर), डॉ. देवेन्द्र मुनघाटे (गडचिरोली)
 
मध्यावकाश  : स्नेहभोजन
 
रात्री १०.०० :  एकांकिका  गिरमी
लेखक : विलास कुंभारे 
दिग्दर्शिका, वेषभुषा, रंगभुषा : सौ.हेमलता धारणे
संगीत, प्रकाश : रवी धारणे          नैपथ्य : विजय भानसे
कलावंत : कु.अपुर्वा चौधरी, कु.सानिका लाखे, विजय भानसे, रोशन पिल्लेवान, नरेश बोरीकर, अतूल येरगुडे, मोहीत तिराणकर, विजय वाटेकर
निर्मिती : सांजप्रभा प्रतिष्ठाण,चंद्रपूर
:  रात्री ११.०० :
 
आदिवासी लोककला
 
रविवार, २६ फ़ेब्रुवारी २०१७
 
सत्र - १ :  सकाळी ०९.०० ते १०.१५ : प्रकट मुलाखत
मुलाखत : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथालेखक श्री आसाराम लोमटे 
               यांची प्रकट मुलाखत
मुलाखतकार : डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते आणि डॉ. ज्ञानदेव राऊत
 
सत्र - २ :  :  सकाळी १०.१५  ते ११.३०  : परिसंवाद - ४
विषय -  पारंपारिक कथा-लोकगीते : ग्रामीण स्त्रित्वाचे वास्तवदर्शन
अध्यक्ष :  मा. डॉ सुमिता कोंडबत्तूनवार (नागपूर)
सहभाग : मा. सौ. प्रज्ञा बापट (यवतमाळ), मा. वसुंधरा काशीकर-भागवत (पुणे)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. सिमा नरोडे (पुणे)
 
मध्यावकाश : चहा
 
सत्र - ३ :  सकाळी ११.४५  ते ०१.००  : परिसंवाद – ५
विषय – शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी ’यशोगाथांचे’ गौडबंगाल
 
अध्यक्ष :  मा. राम नेवले (नागपूर)   
सहभाग : मा. एकनाथ आळेकर, (अहमदनगर) मा. गंगाधर मुटे (वर्धा)
                मा. कैलास म्हापदी (मुंबई), मा. श्रीकांत उमरीकर (परभणी)
संचालन : मा. मदन कामडे (नागपूर)
 
सत्र - ४ :  दुपारी ०१.००  ते ०२.३० : शेतकरी कवी संमेलन - २
अध्यक्ष : मा. डॉ. विठ्ठल वाघ (अकोला)
सूत्रसंचालन : मा. किशोर कवठे (चंद्रपूर)
सहभाग :  साहेबराव ठाणगे (मुंबई), विनिता माने, कविता क्षिरसागर (पुणे), रवींद्र दळवी (नाशिक), राजीव जावळे (जालना), संदीप ढाकणे (औरंगाबाद), नयन राजमाने, शैलजा करंडे, (लातूर), केशव कुकडे (बीड), डॉ विशाल इंगोले, (बुलडाणा), अनिकेत देशमुख (अकोला), वैभव भिवरकर (वाशिम), दिलीप भोयर (अमरावती), के. ए. रंगारी, मुन्नाभाई नंदागवळी (गोंदिया), चित्रा कहाते (नागपूर), कांचन वीर (यवतमाळ), नारायण निखाते, धिरजकुमार ताकसांडे, सुशांत बारहाते, प्रा. मनिषा रिठे, प्रा अभिजीत डाखोरे (वर्धा), रत्नाकर चटप, प्रदीप देशमुख (चंद्रपूर), अशोक गडकरी, राम वासेकर (गडचिरोली), इरफान शेख (चंद्रपूर)
 
मध्यावकाश : स्नेहभोजन
 
दुपारी ०३.०० ते ०३.३० : पुरस्कार वितरण
 
दुपारी ०३.३० ते ०५.०० : समारोपीय सत्र
 
विषय - आता पेटवू सारे रान
 
अध्यक्ष : मा. अ‍ॅड. वामनराव चटप, शेतकरी नेते
सहभाग : मा. श्री  अनिल घनवट (अहमदनगर)
मा. सौ. शैलजा देशपांडे (वर्धा)
मा. राजेंद्रसिंह ठाकूर (गडचिरोली)
 
बळीराजाच्या आरतीने समारोप

Karykram Patrika
*********
Karykram Patrika
*********
गडचिरोलीला पोचण्यासाठी जवळच्या रेल्वे स्टेशन जवळचे अंतर : चंद्रपूर - गडचिरोली ८० किमि गोंदिया - गडचिरोली १६० किमि नागपूर - गडचिरोली १७२ किमि वर्धा - गडचिरोली २१० किमि
Gadchiroli

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 22:58. वाजता प्रकाशित केले.

    Deshonnati

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 23:11. वाजता प्रकाशित केले.

    Sakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 23:12. वाजता प्रकाशित केले.

    Sakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 23:14. वाजता प्रकाशित केले.

    Sakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 23:14. वाजता प्रकाशित केले.

    Sakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/12/2016 - 23:19. वाजता प्रकाशित केले.

    Sakal

    शेतकरी तितुका एक एक!

  • विनिता's picture
    विनिता
    मंगळ, 03/01/2017 - 12:07. वाजता प्रकाशित केले.

    छान. अनेक शुभेच्छा Smile

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 24/01/2017 - 00:28. वाजता प्रकाशित केले.

    कच्ची कार्यक्रमपत्रिका : त्रुटी असल्यास कळवा

    शेतकरी कवी संमेल

    अध्यक्ष : प्रा. डॉ. विठ्ठल वाघ (अकोला)
    विशेष निमंत्रित : मा. राधाबाई कांबळे (परभणी)
    सूत्रसंचालन : मा. किशोर कवठे (चंद्रपूर)
    सहभाग : विनिता माने, रविंद्र कामठे (पुणे), रवींद्र दळवी (नाशिक), राजीव जावळे (जालना), संदीप ढाकणे (औरंगाबाद), नयन राजमाने, शैलजा करंडे, वृषाली पाटील (लातूर), प्रज्ञा आपेगांवकर, केशव कुकडे (बीड), डॉ विशाल इंगोले, (बुलडाणा), अनिकेत देशमुख (अकोला), वैभव भिवरकर (वाशिम), विजय विल्हेकर, दिलीप भोयर (अमरावती), के. ए. रंगारी, मुन्नाभाई नंदागवळी, चंद्रकुमार बहेकार, राजेश हजारे (गोंदिया), दामोधर जराहे (नागपूर), अतुल कुडवे (यवतमाळ), श्रीकांत धोटे, आशिष वरघणे, प्रदीप थूल, धिरजकुमार ताकसांडे, सुशांत बारहाते, डॉ. रविपाल भारशंकर, नाखले, राजेश जवंजाळ (वर्धा), श्री रत्नाकर चटप, श्री चंदू झुरमुरे, श्री अविनाश पोईनकर, किशोर मुगल (चंद्रपूर), अशोक गडकरी, राम वासेकर, रोशनकुमार पिलेवान (गडचिरोली)

    ****
    शेतकरी गझल मुशायरा

    अध्यक्ष : मा. प्रदीप निफ़ाडकर (पुणे)
    सूत्रसंचालन : मा. नितिन देशमुख (अमरावती)
    सहभाग : दर्शन शहा (हैद्राबाद), दिवाकर चौकेकर (गुजरात), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), साहेबराव ठाणगे, विशाल राजगुरु (मुंबई), प्रा. अशोक बागवे, जनार्दन केशव म्हात्रे (ठाणे), प्राजक्ता पटवर्धन (पुणे), विनिता कुलकर्णी (लातूर), राज पठाण (बीड), विजय पाटील, विरेंद्र बेडसे (धुळे), गोपाल मापारी, नजीम खान, जयदीप विघ्ने (बुलडाणा), शरद तुकाराम धनगर (जळगांव), निलेश श्रीकृष्ण कवडे, प्रवीण हटकर, ईश्वर मते (अकोला), संघमित्रा खंडारे (अमरावती), विनय मिरासे (यवतमाळ), श्री रमेश सरकाटे (नागपूर), गंगाधर मुटे (वर्धा), प्रा.राजेश देवाळकर, विजय वाटेकर, रवी धारणे, प्रदीप देशमुख, श्री राम रोगे (चंद्रपूर), सुरेश शेंडे (गडचिरोली)

    शेतकरी तितुका एक एक!

  • Ravindra Kamthe's picture
    Ravindra Kamthe
    बुध, 25/01/2017 - 14:30. वाजता प्रकाशित केले.

    खूपच छान सर.

    रविंद्र कामठे

    आपला विश्वासू,
    रविंद्र कामठे
    पुणे
    भ्र. न. ९८२२४ ०४३३०
    इमेल – ravindrakamthe@gmail.com

  • Ravindra Kamthe's picture
    Ravindra Kamthe
    बुध, 25/01/2017 - 16:02. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार मुटे सर.

    कवी संमेलनात माझे नाव घेतल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. मी रजे साठी अर्ज केला आहे पण मालक भारताबाहेर असल्यामुळे अजून तो मान्य झालेला नाही आणि होईल ह्याची मला श्वास्वती नाही. त्यामुळेच मी तिकीटही काढू शकलो नाही. माझा संमेलनास येण्याचा निश्चित प्रयत्न असणार आहे. माझे ठरले की मी तुम्हांला तसे कळवतो. त्यामुळे पर्त्रिकेत नाव घ्यायचे का नाही हे तम्ही ठरवा.
    तसदी बद्दल क्षमत्स्व.

    रविंद्र कामठे.

    आपला विश्वासू,
    रविंद्र कामठे
    पुणे
    भ्र. न. ९८२२४ ०४३३०
    इमेल – ravindrakamthe@gmail.com

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 25/01/2017 - 17:40. वाजता प्रकाशित केले.

    बघा. प्रयत्न करा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 27/01/2017 - 17:48. वाजता प्रकाशित केले.

    तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन


    दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७

    स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली

    ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी

    प्रतिनिधी शुल्क : १००/-


    * प्रतिनिधींना भोजन, चहा, अल्पोपहार, निवासव्यवस्था आणि माहिती किट नि:शुल्क पुरविली जाईल.
    * मुक्कामाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरुपाची असेल.
    * निवासाकरिता स्वतंत्र खोली (३ व्यक्ती) हवी असल्यास प्रत्येकी अतिरिक्त रु. ५००/- शुल्क भरल्यास स्थानिक लॉजवर बुकींग करुन ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
    * सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता आणि निवासाची संभाव्य गैरसोय लक्षात घेता आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.
    * अग्रीम नोंदणी करणार्‍यांना SMS द्वारे कच्चा नोंदणी क्रमांक कळवला जाईल. मात्र त्यांनी २५ फ़ेब्रुवारीला सकाळी ८.०० ते १०.०० या वेळात संमेलनस्थळी उपस्थित होऊन प्रतिनिधी प्रवेश शुल्क अदा करून प्रत्यक्ष नोंदणी करणे अनिवार्य असेल. अन्यथा कच्चा नोंदणी क्रमांक रद्द समजला जाईल.

    ऑनलाईन नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

    * नोंदणी केल्यानंतर आपली नोंदणी बघण्यासाठी/संपादन करण्यासाठी येथे क्लिक करा.
    * नोंदणीसाठी लॉग इन करणे आवश्यक आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 14/02/2017 - 01:40. वाजता प्रकाशित केले.

    तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
    दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७
    स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली

    सप्रेम नमस्कार विनंती विशेष

    निवासाची व्यवस्था करणे सुलभ व्हावे म्हणून कृपया आपण गडचिरोलीला कधी आणि कसे पोचणार याविषयी ९७३०५८२००४ या नंबरवर खालीलप्रमाणे sms/whatsapp व्दारे माहिती कळवावी.

    १) आपले नाव :
    २) मोबाईल नंबर :
    ३) गडचिरोलीला पोचण्याचा दिनांक आणि अंदाजे वेळ :
    ४) गडचिरोलीवरुन परतण्याचा दिनांक आणि वेळ :
    ५) नागपूर/चंद्रपूर पर्यंत प्रवासाचे साधन रेल्वे/एसटी बस/ट्रॅव्हल्स/खाजगी वाहन :
    ~~~~~~~~~~~~~~~~~
    किंवा http://www.baliraja.com/node/add/rep2017 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी.
    ~~~~~~~~~~~~~~~~~
    टीप :
    अ) आपल्यासोबत अन्य सहकारी असल्यास स्वतंत्रपणे व्यक्तिनिहाय माहिती द्यावी.
    ब) भोजन, चहा, अल्पोपहार, निवासव्यवस्था आणि माहिती किट नि:शुल्क पुरविली जाईल.
    क) मुक्कामाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरुपाची असेल.
    ड) निवासाकरिता स्वतंत्र खोली (३ व्यक्ती) हवी असल्यास प्रत्येकी अतिरिक्त रु. ५००/- शुल्क भरल्यास स्थानिक लॉजवर बुकींग करुन ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
    ई) अधिक माहिती http://www.baliraja.com/node/1073 येथे उपलब्ध आहे.

    कृपया सहकार्य करावे, ही विनंती.

    आपला स्नेहांकित
    गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!