पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
माणूस
अरे माणूस माणूस जसा निर्ढावला कोल्हा धूर्त कसा लबाडीने रोज पेटवितो चुल्हा ......!
अरे माणूस माणूस जसा बक समाधिस्थ मिष साधूचे घेवूनी करी सावजाशी फस्त .....!
अरे माणूस माणूस जसं सरड्याचं अंग वेळ तशी खेळे संधी बदली चामडीचे रंग ......!
अरे माणूस माणूस जसा श्वान पोळी खाया झगडितो आप्तियांशी नाही दया, नाही माया......!
अरे माणूस माणूस जसा इंगळीचा चावं एक बोल जिभलीचा देई कलिजाला घाव ......!
अरे माणूस माणूस जसा कुंभाराचा खर फुकामधी ओझे वाही वर चाबुकाचा मार ......!
अरे माणूस माणूस कसं निसर्गाचं देणं?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.