पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
जरासे गार्हाणे
कुठे नोंदावे गार्हाणे हत्तीने तुडवले तेव्हा वार्याने उडवले आणि पावसाने बडवले तेव्हा ......!
आदर्शाच्या रेघा शिष्यांनीच पुसून टाकल्या त्या महात्म्याला वारसाने रडवले तेव्हा ......!
त्यागुनी रणांगणाला पळपुटे जे पळाले त्यांच्या पराक्रमाला कनकाने मढवले तेव्हा ......!
जीविताची राख ज्यांच्या, सिंहासने घडवताना त्यांच्याच चामडीचे पायतणे चढवले तेव्हा ......!
बसवूनी खांद्यावर अभयाने आधार दिला, तोच हितशत्रू ! कारस्थाने दडवले तेव्हा ......!
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.