पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी गीत
रे जाग यौवना रे....!!
रे जाग यौवना रे, ही साद मायभूची आव्हान पेलुनीया, दे आस रे उद्याची रे जाग यौवना रे ... ॥धृ०॥
झटकून मळभटाला, चैतन्य खळखळावे भटकून आसमंती, हे रक्त सळसळावे तारुण्य तेच जाणा, जे धडपडे सदाची रे जाग यौवना रे ... ॥१॥
आता कवेत घे तू, अश्रांत सागराला कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची रे जाग यौवना रे ... ॥२॥
आकाश अंथरोनी, तार्यास घे उशाला बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला विश्वा प्रकाश दे तू, तू ज्योत शारदेची रे जाग यौवना रे ... ॥३॥
तू वीर मायभूचा, बलसागराप्रमाणे यत्नास दे उजाळा, युक्ती-बळा-श्रमाने
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.