Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none




नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू

कृपया प्रसिद्धीसाठी
मा. सपादक, दै. ..............

*नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु*
(स्वतंत्र भारत पार्टीच्या प्रयत्नांना यश )

कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती. दि. १९ एप्रील पासून महाराष्ट्रात नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात आली असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीसाठी दिली.
महाराष्ट्रात या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. विक्रमी उत्पादन ही अपेक्षित आहे. कांद्याचे दर कोसळणयाची शक्याता लक्षात घेऊन स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी राष्ट्रवादी पार्टीचे नेते शरद पवार व भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते.दिल्ली येथील नाफेडच्या मुख्य कार्यालयात जाऊन नाफेडच्या कार्यकारी संचाकांची ही भेट घेतली होती. मुल्य स्थिरीकरण निधी अंतरगत, किमान १५/- रु प्रति किलो दराने कांदा खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्व. भा. प. च्या मागणीची दखल घेत शासनाने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्वी १ लाख सत्तर हजार कांदा खरेदी करण्यात आला होता, त्या तुलनेत ५० हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार आहे. सध्या प्रचलित बाजारभावा प्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेण्यात आला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील २० शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी व साठवणुकीची जवाबदारी देण्यात आली आहे. मागील कांदा खरेदीच्या वेळेस बराच आर्थिक गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. या वेळेस स्व. भा. पार्टीचे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. शासनाने शेतकर्‍यासाठी उपलब्ध केलेल्या पैशाचा उपयोग शेतकर्‍यांच्या फायद्यासाठीच झाला पाहिजे हा हेतू आहे. स्व. भा. पार्टी च्या मागणीची दखल घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरु करण्याची कार्यवाही केल्या बद्दल कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर व शरद पवार व दादासाहेब भुसे यांचे आभार मानले.
२०/०४/२०२२

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी.

शेतकरी संघटना समाचार
Share