पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी काव्य
//आईचं छप्पर// कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिव भरी ...! हिव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रह्मपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहताना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! - गंगाधर मुटे 'अभय' ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.