
  नमस्कार !  ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे.  | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विकासाची क्रांती
दिवसभर काबाडकष्ट
अन् हाती रोजंदारी
रात्रीची निर्भय झोप
कुटुंबासवे अपुल्या घरी ll१ll
                  या महाकठीण दिवसात
                  आहे जिथे बेरोजगारी
                  पोटाची तडप शमविण्या
                  पर्यायी हत्यार उगारी ll२ll
याचाच फायदा घेत
निर्लज्ज लोक पुढारी
राम - रहीमच्या नावे
या देशात दंगे करी ll३ll 
                  न राम न रहीम कलियुगात
                  या जनतेचे जीवन तारी
                  निष्पाप जनतेला न उरे
                  आज इथे कैवारी ll४ll
नकोत तंटा अन् धर्मवाद
आज हवी आहे शांती
आम्ही सर्व भारतीय आहोत
यातच आहे विकासाची क्रांतीll ५ll 
संदीपकुमार