नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पिक डोलतया भारी,
धन्याच्या शेतात,
आनंद मावेनासा झाला,
अर्धांगीनीच्या मनात .....
हाकलण्या पाखरे त्यान,
हातात घेतली गोफण,
प्रसन्न ह्दयान तो,
जिवनाच गातो गान ..........
शेतीसाठी तिच त्यान,
ठेवल सोन गहाण,
पिक आल लई भारी,
घेऊ म्हणे सोडवुन ...........
रान फुललया भारी,
हर्ष दोघांच्याही मनी,
अर्धांगीनी हट्ट धरते,
यंदा करा म्हणे एकदानी ......
कष्टाचा हा त्याचा,
रोजचा प्रवास,
कधीकधीच निघतो,
हा सोनियाचा दिस .........
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी
प्रतिक्रिया
पिक डोलतया भारी, धन्याच्या शेतात,
कधीकधीच निघतो,
हा सोनियाचा दिस
वा!
हेमंत साळुंके
पाने