नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तफावत
घाम गाळुन मातीत
मातीला ही केलं जित्तं
आज सोन्यानं मढ़ली
मका बाजरीची ताटं
त्याच्या कणिसाला तरी
खरी किंमत मिळेना
सुट्या सुट्या आयुष्याचा
बंदा रूपया होईना
जन्म वरचा घालतो
अन् पोसतो खालचा
धान पेरून शेतात
'बाप झाला' हा जगाचा
कसा पाहतो वरुन
खालच्याची परिस्थिती
दोन्ही देवांमधी अशी
आहे तफावत किती..?
-'सागर'जाधव'जोपुळकर'
'चांदवड'
'9404805068'
sagar.jadhav008@gmail.com
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने