नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गाय
गुरुजीनं देलेला होमवर्क करता करता..
गोम्या एकदम चाचपला.
अना पुना-पुना वाचू लागला
वाघ हा भारताचा राष्ट्रिय परानी आये,
अना या वाघ राज्याची एक महाराणी आये,
'अवो मा हे कसा वो?
एकदम वचखला गोम्या..
भारत हा कास्तकाराईचा देस
होना वो मा?
सेतीसाटी तं गो माता बैल देते ना?
बाघ तं परानी खाते
गावातले मानसा मारते
कुरसी परदान भारतामंदी
राष्ट्रिय परानी तं,
गाय पायजे होती का नाई.
येती तं उलटा छापला आये,
गोम्या अस्या उलट्या-सुलट्या सवालाना त्याची
मा गेली गांगरुन...!
अना ईचार करु लागली
उत्तर काई तिले मिरला नाई.
ते वारलीच रागाना आपल्या पोरावर
बफरली.
राष्ट्रिय परानी ठरवावाचा
तुज्या माज्या हातात नसं
गोम्या..!
हा तुजा न माजा काम नोये
जा,सरकारलंच इचारना
माजा काहालं डोकसा
खातेस?
- बंडोपंत बोढेकर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
(झाडीबोलीतील काव्य)
प्रतिक्रिया
सुरेख प्रश्न विचारला
डोकं खाजवायला भाग पाडणारा प्रश्न विचारला गोम्याने.
चांगली कविता. झाडीबोलीतील असली तरी समजली.
शेतकरी तितुका एक एक!
हे असच कांही बाही....
का थोपाव निरागसांवर?
हेमंत साळुंके
पाने