नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवितेचे माध्यम हाताळणे काहीसे कठीण असले तरी निवडक काव्यपंक्तीतून योग्य तो आशयघन वाचकापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ्य त्यात नक्कीच आहे. याचे भान आपण राखलेत आणि म्हणूनच आपल्या कवितांना वास्तवाचा परिसस्पर्श लाभला आहे. कविता वाचनीय झाल्या आहेत. वास्तव कितीही भडक असले, बोचणारे सत्य असले तरी ते कसे मांडायचे हा ज्या लेखकाचा अधिकार आहे. आपण जे लिहितोय ते वाचण्यायोग्य असावे, त्यातून निखळणार्या भावना प्रामाणिक असाव्यात.... एवढेच! एक खरे की आपल्या बहुतांशी कवितांना अनुभवाची किनार लाभलेली आहे, उत्तम बाज साधलेला आहे.
आमच्या आनंदवन वाचनालयात ठेवण्यात आलेले हे संग्रह इथे येणार्या वाचकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा बाळगावयास हरकत नाही.
सानंद आभार! आनंदवनी सदैव स्वागत. सुमंगल शुभकामनासह....!
आपले शुभाकांक्षी
डॉ.विकास आमटे
डॉ. सौ. भारती आमटे
महारोगी सेवा समिती, वरोरा
== ० == ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==० == ० == ० == ० == ० == ० ==