Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नैसर्गिक (सेंद्रिय) शेती एक काळाची गरज

लेखनविभाग :: 
प्रेरक लेख
लेखनाचा विषय: 
शेती आणि शेतकरी

हिच निकड ओळखून पुर्वी इंग्लंड मधील एक वनस्पती शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हावर्ड यांनी पुर्वा पार चालत आलेल्या शेतीवर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी वापर केला . या नैसर्गिक व वैज्ञानिक सांगड मुळे शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दिसू लागला व त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करणे सुरू केले. म्हणूनचं त्यांना आधुनिक शेंद्रिय शेतीचे 'जनक ' समजल्या जाते.
अन्नधान्याने देश सक्षम करण्यासाठी मध्यंतरी आलेल्या 'हरीत क्रांती' मुळे शेतकऱी आकर्षित झाले. तसे त्यांचे उत्पन्नात भर पडत गेली व सुबत्ता वाढून देश प्रगतीपथावर वाटचाल करू लागला.
परीनामता अधीकाअधीक उत्पादन घेण्याच्या नांदात शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढून रासायनिक खतांचा अव्वाच्या सव्वा वापर वाढला. शेजारी शेतकऱ्यांने एकरी पाच बोरी खत टाकले तर आपण सात बोरी टाकुया . आपल्या शेताचा कसलाही विचार न करता जमीनीचा 'सामु' किती ,कोणत्या घटकांची उनीव आहे हे काहीही न पाहता .या अती होणाऱ्या वापरामुळे पिकावर रोग प्रादुर्भाव खूप वाढून पिके विविध रोगांना बळी पडू लागली.
पिकावर आता येवढा खर्च झाल्यावर औषधाची फवारणी आलीच ते ही खूप महागडी व अनेक प्रकारची.अश्या विविध व जिवाला घातक रासायनिक औषधांच्या अती वापराने रोग निर्मुलन तर सोडाच पण शेतकरी आपल्या अत्यंत उपयोगी असलेल्या मित्र किडींचाच नायनाट करताहेत.हे काही काळ चांगले चालले पुर्वी बैलांच्या साह्याने निव्वळ वखर वाहीने सुद्धा पेरणी योग्य जमीन तयार व्हायची आता तर मशीनरीने ही दोन दोन तिन तिन वेळा नांगरणी करून सुद्धा तयार होत नाही.याचा जरूर विचार व्हायला हवा.अशा जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहत जाते.त्यामुळे जमीन एकदम टनक बंजर बनलेली आहे .आज थोड्या हव्यासापोटी भाजीपाला,फळे खाद्य पदार्थांत केमिकलचे प्रमाण खूप वाढले आहे . याने मानवी जीवन पार विस्कळीत झाले रोगराईने थैमान घातले आहे नवनवीन असाध्य आजार निर्माण होत आहेत हे फार गंभीर आहे.
म्हणून आता अत्यंत सकस आहारासाठी नैसर्गिक सेंद्रिय अन्न पदार्थाची खूप च आवश्यकता आहे.हे आपल्याला शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, गोमूत्र, शिवामृत, तसेच व्हर्मिकंपोष्ट याचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढते.तसेच पुर्वापार चालत आलेल्या प्रथा म्हणजे पिकाची फेरपालट अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या हंगामात येणारी मिश्र पीक पद्धती.जसे कापसाच्या दोन ओळीत कडधान्याची (मुंग -उडीद ) एक ओळ टाकली तर मुंग काढनी वेळेस त्याचा पाला पाचोळा,काड्या सर्व गळून पडतात त्यावर वखराची पाळी दिल्याने ते सर्व मातीत गाडल्या जाते. मग त्यापासून भरपूर प्रमाणात नत्र उपलब्ध होऊन कापसाच्या पिकाला मिळतोय.तसेच धैचा,बोरू, कडधान्यांच्या वापराने शेतातल्या शेतात हिरवळीची खते भरपूर प्रमाणात उपलब्ध होऊन ती पिकांना १००/ टक्के उपयोगी पडते.न जाळता पिकांचे टाकाऊ अवशेष गुरांचा खाऊन झाल्यावर उरलेला पालापाचोळा हे सर्व काही जमीनीत गेल्यावर जमिन एकदम भुसभुशीत होते व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढून शुष्म जिवानु वाढीस लागतात .दुसरे म्हणजे रोगप्रतिकारक घरचेच बियाणे वापराने किड व रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो म्हणून त्यावर कडुनिंबाचा पाला, गोमुत्र,ताक, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काने नियंत्रण ठेवता येते.
सेंद्रिय पद्धतीत जमीनीचा कस कायम राहतो बरेच काही घरचेच असल्याने खर्च फार कमी प्रमाणात होतो.बियाणे स्वतःचेच असल्याने उत्पादनांची गुणवत्ता वाढते.
सेंद्रिय शेती ही एक निसर्ग पुर्वक जिवनशैली आहे त्यामुळे पर्यावरण व मानवी जीवन आरोग्य समतोल राखल्या जाते म्हणून च आज नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे.

साहेबराव तायडे अकोला.