Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




मिळेल का बळीला न्याय?

लेखनविभाग :: 
पद्यकविता

हा पाठवणे

अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ आयोजित ऑनलाईन लेखस्पर्धा 2024 साठी लेख

विषय - शेतमालाचे भाव

शीर्षक - न्याय आणि वाव बळीराजाचा

शेतमाल हा नशिवंत असतो तसेच शेतकऱ्याकडे त्याच्या मालाची साठवणूक करणे आणि ते जतन करून ठेवणे यासाठी महागडी यंत्रणा नसते. त्यांना डोक्यावरच्या कर्जाचा भार कमी करायचा असतो. त्यामुळे मिळेल त्या भावाला ते आपला माल विकायचे पाहतात. त्याचाच फायदा व्यापारी आणि दलाल घेतात. इथेच शेतकऱ्याची पिळवणूक व्हायला सुरूवात होते. बाजारात येणाऱ्या सर्व मालाची किंमत उत्पादित सेवा आणि वस्तू यांची अशी एक विशिष्ट ठरवली जाते किंवा छापली जाते. परंतु शेतमाल मात्र बाराच्या भावात विकला जातो. दिवसरात्र खपून बळीराजा अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवत असतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी अवकाळी, महापूर तर कधी दुष्काळ अशा संकटाचा सामना देत तो आपल्या पोटाला चिमटा घेऊन घरातल्या लेकरांना शिक्षण देणे, वाढवणे पोसणे ही आपली जबाबदारी समजत असतो. परंतु ग्राहक मात्र त्याची मन:स्थिती समजून न घेता पडेल भावाने त्याचा माल खरेदी करू पाहतात.
मॉलमध्ये जाऊन हजारो रुपयांचे कपाटात थप्पी लागलेली असूनही कपडे, सौंदर्यप्रसाधने, सराफाकडे जाऊन लाखो रुपयांचे दागिने खरेदी करतात. हॉटेलमध्ये जाऊन एका वेळेला पाच दहा हजाराची बिले होतात. एका नाष्त्याला स्विगी, झोमॅटोमधून हजार दोन हजाराचा पिझ्झा, बर्गर मागवतात पण पाच दहा रुपयांसाठी शेतकऱ्याकडे झिगझिग करत असतात. शेतमालाचे बाजार भाव वाढत नाही तर वाढलेल्या बाजारभावाचा फायदा उत्पादक शेतकऱ्याला होत नाही असे आहे याचे कारण आहे शेतकरी आणि उपभोक्ता यांच्यामधील साखळीत समाविष्ट असलेले दलाल आणि त्यांची दलाली. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून बाजार भाव वाढवून घेऊन एका बाजूला शेतकऱ्याला आणि दुसऱ्या बाजूला उपभोक्त्याला लुटणारे दलाल आणि अर्थातच राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या कृषी उत्पादन बाजार समिती. कृषीमालाच्या बाबतीत ही साखळी फार मोठी असते त्यात अनेक राजकारणी समाविष्ट असतात त्यांचे प्रभावक्षेत्र मोठे असते. त्यामुळे हे सर्व दलाल एकत्र येऊन बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात आणि बाजारभाव वाढवून घेऊ शकतात. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यास असलेले सर्व निर्बंध काढून टाकून त्यांना तिथे चांगला भाव मिळेल येथे विक्री करण्याचा प्रसंगी राज्याबाहेर शेतमाल घेऊन तेथे विक्री करण्यास देण्यासाठी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केले होते ते शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा म्हणून. शेतकरी असल्याचा आव आणून त्या कायद्यांना खास करून पंजाबात तीव्र विरोध करण्यात आला आणि ते कायदे मागे घेण्यात आले. आता या मागचे राजकारण लक्षात घेतले तर समजून याला हरकत नाही की कायद्यांचा लाभ जरी शेतकऱ्यांनी घेतला असता तर त्यांचा आणि उपभोक्त्यांचा फायदा झाला असता, मात्र या साखळीतील दलालांचे मोठे नुकसान झाले असते. शेतीचा माल हा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्याला पडेल भावात आपला माल विकावा लागतो. हे दलालांनी चांगलेच ओळखले आहे त्यामुळे ते शेतकऱ्याचा भाव पाडून मागतात आणि स्वतःची तुंबडी भरतात. ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन जास्त आहे आणि यंत्राद्वारे शेती करू शकतो त्यांना थोडा तरी फायदा होऊ शकतो पण वडिलोपार्जित जमीन कमी असेल आणि त्यात अनेक वाटण्या झाल्या असतील तर तुकड्याची जमीन कसून शेतकऱ्याला पोटापुरते देखील अन्न खायला मिळत नाही.
जो पोशिंदा दिवसरात्र, थंडी, ऊन,वारा पाऊस याची पर्वा न करता एखाद्या रोजगाऱ्याप्रमाणे शेतातल्या चिखलात अनवाणी खपत, राबत असतो. डोक्याला फाटके मुंडासे बांधून मांजरपाट कापडाची बंडी आणि चिंध्या झालेले धोतर घालून तो कुटुंबातील लोकांना पोसत असतो. ना कधी तो ए.सी. च्या गाडीतून मॉलमध्ये खरेदी करायला जात ना पंचतारांकित हॉटेलमधले जेवण खात! नको त्याला पिझ्झा बर्गर , ना सुट कोट घालून फिरायची अपेक्षा. त्याला फक्त एकच आशा असते की त्याच्या कष्टाला वाव मिळावा, न्याय मिळावा आणि त्याच्या शेतातल्या मालाचा उठाव व्हावा. त्याला योग्य दर मिळावा. घरातली भाकरी, कांदा, बेसन, ठेचा असे जेवण खाऊन तो आपली भूक भागवत असतो. उशाला झाडाचा बुंधा आणि डोईवर आभाळाचे छप्पर, जमिनीचे अंथरूण करून तो दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ कलंडतो आणि दिवसभर काळ्या आईची सेवा करत असतो. तो थकत नाही, चिडत नाही. आपल्या नशिबाला दूषणे लावत नाही, तर जेवढे शक्य आहे तेवढे तो कष्ट करत असतो. शेतात राबत असतो. त्याच्या सोबतीला त्याची घरधनीण देखील त्याला बरोबरीने साथ देत असते. सकाळी दही भाकरीची न्याहारी करून बाहेर पडलेला बळीराजा दुपारी आपला निढळावरचा घाम पुसत आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसतो तेव्हा त्याची घरधनीण घरातील रांधा, वाढा, उष्टी काढून जनावरांचे शेणपाणी, दूध काढून, मुलांना शाळेत पाठवून टोपलीतून त्याला भाकरी, ठेचा, बेसन आणि कांदा घेऊन येते. भल्या पहाटे उठून खांद्यावर नांगराचा फाळ आणि हातात ढवळ्या पवळ्याचा कासरा घेऊन तो शेतात गेलेला असतो आणि त्याच्या कामाला सुरुवात केलेली असते. त्या श्रांत जीवाला दोन वेळच्या पोटाचीसुद्धा मारामारी असते. 'ना पंचपकवान्नाचा घास खायला ना गादी गिरद्या झोपायला' तरी देखील लाखो रुपये पगार घेणारा हा नोकरदार दोन रुपयाच्या कोथिंबीरीचा त्याच्याकडे दर कमी करण्यासाठी झिगझिग करत असतो. तुमच्या शेतातला माल आहे तुम्ही फुकट द्यायला हवे असे तोंड वर करून बोलत असतो. तेव्हा मात्र त्याचे रक्त उसळून उठते. आज भाजीपाला विकला तर संध्याकाळी मीठ मिरची पुरता पैसा मिळेल अशी आशा ठेवून तो दिवसभर बाजारात उन्हांत बसून आपला माल विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सरकारकडून, ग्राहकांकडून फारशा अपेक्षा नाहीत पण त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळण्यासाठीचा त्याचा अट्टाहास, आटापिटा असतो. तो देखील आपणासारख्या सुशिक्षित, नोकरी करणाऱ्यांना समजू नये का?
या पैसेवाल्यांच्या दुनियेत बळीराजाला नेहमी गृहित धरले जात असते. शेतकरी म्हणजे अडाणी, निरक्षर आणि हातावर पोट असणारा निरुपद्रवी प्राणी! त्याला जास्त अपेक्षा असू नयेत असा समाजाचा ग्रह झालेला असतो. त्यामुळे त्याच्या कष्टाला मातीमोल ठरवले जाते. आजच्या जमान्यात केस कापणारे मोठे सलोन उघडून बसलेत.चपला विकणारे शोरूमचे दुकान उघडून बसलेत. सोनार, सुतार, लोहार अशा बारा बलुतेदारांचे आजकाल चांगले दिवस आले आहेत. मग कुणबी असणाऱ्या शेतकऱ्याने आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू नये का? कुत्र्या मांजरासारखे जीवन जगावे आणि कीडामुंगीसारखे पिचून, चिरडून मरावे हे त्याच्या नशिबात लिहिले असेल का? मग आपण त्याच्या जीवनाला मातीमोल का ठरवतो? त्याच्या मालाला किंमत मिळावी असा आपला अट्टाहास का असू नये? त्याच्या कष्टाची आपण योग्य किंमत का देऊ शकत नाही? आजकाल असे दिसून आले आहे की रस्त्यावरचा माल देखील जाहिरातबाजी करून, गिर्‍हाईकाच्या कानीकपाळी ओरडून विकला जातो. खराब, योग्य गुणवत्ता नसलेला मान डिस्काउंट देऊन ग्राहकांच्या पदरात टाकला जातो. आपला बळीराजा मात्र त्याच्या मालाची कधीच जाहिरात करताना दिसत नाही. जे त्याने आपल्या घामाचे मोल देऊन अन्नधान्य , भाजीपाला, फळफळावळ शेतात पिकवलेले असते ते तो विकायला बाजारात घेऊन येतो.मग त्याच्या कष्टाचे योग्य मोल आपणच करायला नको का? त्याचा माल शंभर नंबरी असून देखील आपण पडेल किमतीत त्याला फसवायला पहात असतो.असा व्यवहार काय कामाचा! दिवस रात्र शेतात कष्ट करणारा बळीराजा आपण अडाणी, निरक्षर आणि गरीब समजतो आणि लाच खाणारे ऑफिसर, नेते यांची हांजी हांजी करतो. त्यांच्यासाठी कितीही पैसे मोजायला आपण तयार असतो असे का व्हावे? अशा आपल्या या वृत्तीमुळेच नवीन पिढी शेती करायला धजावत नाही. कारण केलेल्या कष्टाचे योग्य फळ त्यांना मिळत नाही आणि छानछौकीचे जीवन जगायला मिळत नाही. हातात स्मार्टफोन शर्ट पॅन्ट सूट बूट घालून नोकरी करायला जाणारा आणि लाखोंनी पगार दर महिन्याला कमावणारा आपल्या मनात प्रतिष्ठित असतो आणि दिवसभर शेतात, मातीत हात घालून काम करणारा बळीराजा मात्र क:पदार्थ! हे किती न्यायाचे? बळीराजाने पिकवलेला माल दलाल लोक बाजारात आणतात तेव्हा आपण वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार होतो. मग आपला बळीराजा असे उपरे जीवन का जगावा हा कोणी विचार करू नये का? बळीराजाला बाजारला माल घेऊन येण्यासाठी भल्या पहाटे उठावे लागते. शेतात जाऊन भाज्या तोडून त्याची जुडी करावी लागते. ती जड पाटी डोक्यावर घेऊन वागवत बाजारापर्यंत आणावी लागते. दिवसभर त्याच्या पोटात अन्नाचा घास देखील जात नाही. संपूर्ण माल विकेपर्यंत त्याला एका जागेवर बसून माल खपवावा लागतो. आज कोथिंबीर, भाजीपाला चाळीस, पन्नास रुपये किलोने विकला जातो परंतु बळीराजाला वर्षभर किती कष्ट करावे लागतात .शेतात वाढलेले तृण विळ्याने कापावे लागते. पिकाला कीड लागू नये म्हणून औषध फवारणी करावी लागते. बेभरोशाच्या पावसामुळे पुरेसा पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी मिळावे म्हणून विहिरीतून किंवा कालव्यातून पाणी पुरवावे लागते. त्यासाठी रात्रीचा दिवस देखील करावा लागतो.
शेतकरी आपल्या शेतात जे अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवत असतो ती उत्पादने निसर्गाशी निगडित आहेत, म्हणजेच सिझनल आहेत. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो. त्यामुळे त्याच्या किमती निश्चित करून मागणीची वाट पाहणे जमत नाही.याचाच दलाल लोकं फायदा उचलतात. वाहतूक, पेट्रोलवाढ तसेच मालाची गुणवत्ता अशी कारणे देऊन शेतमालाची किंमत पाडून खरेदी करतात. यामुळे मेहनत करणारा शेतकरी चवल्या, पावल्या घेऊन घरी जातो आणि मधला दलाल गब्बर होतो.
शेतमालाला हमीभाव ही संकल्पना १९७० च्या दशकाच्या मध्यात आली १९६० ते १९६५ या काळात भारताने मोठ्या दुष्काळाचा सामना केला आणि दोन युद्ध लढली. ज्यात कृषी क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. १९६६ मध्ये भारतात पहिली हरितक्रांती झाली. त्यावेळी भारतभर कृषी उपक्रमांना चालना आणि बळकटी मिळण्याची गरज होती. १९६४ मध्ये एल.के. झा यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याच्या किमतीवरील झा समितीचा अहवाल या देशासाठी कृषी मूल्य धोरण आयोजित करण्याचे पहिले पाऊल होते. १९६६ मध्ये एम. एल. दंतवाला यांच्या नेतृत्वाखाली एपीसी ने पहिला अहवाल सादर केला. आयोगाने धानासाठी एम एस पी सुचवले तेव्हापासून चार विविध आयोग आले आहेत एमएसपी योजनेअंतर्गत आजपर्यंत सात तृणधान्ये, पाच कडधान्ये, सात तेलबिया आणि चार व्यावसायिक पिके समाविष्ट केली आहेत. न्यायालयांना अशा प्रकरणांचा विचार करण्याचे अधिकार नसल्यामुळे नागरिकांना सार्वजनिक मंचावरच या विषयांवर लढावे लागते. या विषयावर कधीही खटला चालवला गेला नाही. व्यवहारिकदृष्ट्या ते शक्य असले तरी कोणतीही शेतकरी संघटना न्यायालयात खटले दाखल करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट केवळ सार्वजनिक व्यासपीठावर या विषयावर चर्चा करण्यात त्यांना आनंद होतो.
तथापि २०२१-२२ दरम्यान दिल्ली येथे शेतकरी आंदोलन कृषी संघटनांनी एमएसपी धोरणाला केवळ धोरणातून कायद्याचा भाग बनवण्याची मागणी केली. एकदा का एमएसपी बाबी कायद्याचा एक भाग बनल्या की त्यावर कायद्याच्या कोर्टात खटला चालवला जाऊ शकतो. आज आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेत जमीनीचे भावाभावांच्यात अनेक हिस्से होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्पादनदेखील घटत आहे. वडिलोपार्जित शेत जमीन कमी आणि नवीन जमीन खरेदी करण्यासाठी लोकसंख्या वाढीमुळे पुरेशी जमीन शिल्लक राहिलेली नाही. अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. निसर्गचक्रावर त्याची सारी भिस्त! अनियमित पाऊस आणि कडाक्याचे उन्हं यात शेती कशी पिकेल आणि बळीच्या पदरात काय पडेल याचे अनुमान कोणी काढू शकत नाही. महापूरात उभी पिके आडवी होतात आणि मेहनतीसोबत पुरात वाहून जातात.अशा वेळी बळीला कोणी वाली उरत नाही. शासनाकडून मदतीचे गाजर दाखविले जाते पण त्या मदतीपैकी पाव टक्का मदत शेतकऱ्याच्या हातावर टेकवली जाते नि बाकीची मधल्यांच्या घशात जाते. जगाचा पोशिंदा हात चोळत रहातो आणि डोईवरचा कर्जाचा डोंगर वाढला की आत्मघात करून घेतो. वर्षानूवर्षे हीच परिस्थिती पहायला मिळते. समाज एक दोन दिवस हळहळ व्यक्त करतो आणि पुन्हा पाढे पंचावन्न. आत्महत्येचे हे सत्र चालूच राहते.
अशा अनेक कारणांमुळे शेती करणाऱ्या युवकांची संख्या कमी झाली आहे आणि ग्राहकांची संख्या जास्त आहे. हल्ली तरुणांना छानछौकी जीवन जगण्याची सवय झाली आहे. झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग मिळवण्याच्या नादात पारंपारिक शेती करणे आता अशक्य होऊन राहिले आहे. शेतीतून पुरेसे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेती करण्यासाठीचा तरूण पिढीचा कल कमी झाला आहे. शेतकरी चळवळीतील नेते सरकारकडे जाऊन भाव मागतात. परंतु सरकारने कधी जास्त भाव दिलाच नाही. कारण ते आपलीच सेटिंग करत असतात असे वाटते.
या सर्व घटनांचा आढावा घेता एकच बाब लक्षात येते की बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. आज त्याच्या मेहनतीमुळे आपण सुखाची भाजीभाकरी खात आहोत. तो आपले पालनपोषण करतो आणि म्हणुनच आपण घरबसल्या दोन वेळेचे अन्न पोटात घालत असतो. आपण त्याचे ऋणी व्हायला हवे, त्याच्या व्यथा समजायला हव्यात. त्याच्यासारख्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत सुखनैव जीवन कसे जगायचे हे त्याच्याकडून शिकायला हवे तरच माणूसकीचे दर्शन घडेल.
इसवी सन १९३५ मध्ये सातारा येथे जन्मलेले शरद अनंत जोशी हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या इच्छापत्रात शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. त्यांनी १९७७ पासून आजतागायात शेती व वर्तमानपत्रीय स्तंभ लेखन केले व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत राखणे आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे हे त्यांच्या लिखाणाचे प्रमुख उद्दिष्ट होते. शेतकरी संघटना करून शेतमालाला योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टासाठी योग्य न्याय मिळवून देणे असा आहे.

'जय जवान जय किसान' लालबहादूर शास्त्रींचा हा नारा आपण कायम लक्षात ठेवायला हवा.

सौ.भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई

9653445835