नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवडीमोल दाम
रक्त आटविले आणि जिरविला घाम
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम ॥धृ.॥
कष्ट केले खूप शेतात दिनराती
झुकविले आभाळ आणि पिकविले मोती
आमुच्या या कष्टाची नाही त्यांना जाण
मातीतल्या राबण्याला काय हो इनाम? ॥१॥
बाजार घराचा मांडला गुरेढोरे विकून
सत्ता या हावरटांची टाकावी उलथून
महागाईशी लढताना जातो आमचा प्राण
लुटारू सत्ताधारी करी काय काम? ॥२॥
कितीही करूद्या त्यांनी काळे काम
त्याचाही त्यांना असतो अभिमान
असे लोक आता बसवावेत घरी
पुन्हा कशाला त्यांना द्यावे मतदान ॥३॥
- मुक्तविहारी
डी - ९८/४, स्नेहबंध सभागृहाजवळ, ऊर्जानगर,
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वसाहत, चंद्रपूर - ४४२४०४
मो.९८६०९८५९११
ईमेल : muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
सर्वांनी प्रतिसाद देऊन
सर्वांनी प्रतिसाद देऊन अभिप्राय नोंदवावा.
मुक्तविहारी
खरेच आहे सर, शेतकऱ्यांच्या
खरेच आहे सर, शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम
पाने