
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सोडू नको धीर
शेतकरी राजा
घेऊ नको फासी
राहील जग उपाशी
 तुझ्याविना ...१
साऱ्या दुनियेचा
तूच मायबाप
उगी हापाहाप
करू नको ...२
भूमीवरील स्वर्ग
केला तेव्हा निर्माण
का रे विसरून
जातोशी तू...३
कुणाची तू आशा
करीशी का व्यर्थ
तूच एक समर्थ
जगामाजी ...४
धरणीतून सोनं
पिके कष्टातून
उगीच  कर्जानं
 वाकू नको...५
जाईल संपून ही
दुष्काळाची धग
पावसाळी ढग
   दाटतील ...६
भेगाळल्या भूमीच्या
शमविण्या झळा
पुन्हा पावसाळा
येत असे...७
 नको सोडू धीर
नको गमावू विश्वास
हेही दिस-मास
सरतील...८
   - अनंत मुंडे
     नाथ निवास, प्रिया नगर, परळी वैजनाथ,
     जिल्हा बीड - 43 15 15
     मोबाईल क्रमांक - 94 20 33 12 17
 
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने