नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
( 'सैनिकहो तुमच्यासाठी'.. या गीताचे गीतकार आदरणीय गदिमांची माफी मागुन..विडंबन गीत)
कृषिकहो तुमच्यासाठी..
खादीधारी महोदयांचा, घास रोज अडतो ओठी
कृषिकहो तुमच्यासाठी, श्रमिकहो तुमच्यासाठी ॥ध्रु॥
वावरतो फिरतो आम्ही, सत्तेत विरोधी बसतो,
मनी विचार सदैव आमच्या, दिवट्या चिमण्यांचा असतो,
परि आठव येता तुमचा, आश्वासने देऊ खोटी..॥१॥
राबता उपाशी तुम्ही, जगतास अन्न पिकवुनी,
तुमच्यास्तव आमुची सत्ता, तुमच्यास्तव ही घराणी,
हमीभाव बाजुला करुनी, आम्ही कमवितो कोटी..॥२॥
उगवला दिवस हा जळतो, अंधार दाटतो रात्री,
आम्ही विदेशात मग पळतो, तुमच्याच खिशाला कात्री,
करु विमानात बैसुनी, दुष्काळ पहाणी मोठी..॥३॥
कर्जास बुडविणे पारं, आम्ही ते जाणिले थोरं,
का जीवास लावी घोरं, का गळ्यात घेई दोरं,
सरसकट माफी करतो, टाकुनी अंशतः अटी..॥४॥
कृषिकहो तुमच्यासाठी, श्रमिकहो तुमच्यासाठी.॥
कवी,
दिवाकर जोशी
बजरंग नगर,तहसील मागे,
परळी वैजनाथ जि.बीड.431515
मो.नं.9822186247,8668453390
email-diwuj306090@gmail.com
प्रतिक्रिया
छान सर
छान विडंबन सर
मुक्तविहारी
धन्यवाद कविवर्य.
धन्यवाद कविवर्य.
दिवाकर जोशी
वाह....वाह.....खुप सुंदर रचना
वाह....वाह.....खुप सुंदर रचना सर.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण