![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आशेच्या वाती
राबराबुनी कष्टाचं.....हो.. ss
नाही मिळत हो दाम-3.....(धृ)
कर्ज काढून केली शेती
दुष्काळानं केली माती
सावरूनी पुन्हा मी नव्याने
पेटविल्या आशेच्या वाती
तरी शासनकर्त्यांना.... .हो..ss
नाही फुटत हो घाम...........(1)
एका दाण्याचे केले हजार
नाही हक्काचा बाजार
कामपूरतेच हे मामे
जडलाय सत्तेचा आजार
कारखाना हा आमचाच.... हो..ss
नाही हक्काचं हो काम.....(2)
कर्जाच्या विळख्यात शेती
ध्येयधोरणांची झाली माती
पेटून उठा हो आतातरी
लई सोशिले घाव छाती
लढा लढूया हक्काचा.....हो.ss
हाती घेऊनी कलम.....(3)
- रंगनाथ गु. तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि. वर्धा
7387439312
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद
पाने