![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
जो असावा दृढ विनिश्यच तोच नाही आजही.
जोश असुनी काय करता होश नाही आजही.
(हुस्नेमतला)
खिळखिळी ही राहुटी बिनधोक नाही आजही.
जाग सोडा माणवाला झोप नाही आजही.
(१ रा शेर)
कालही होत्याच भिंती आसमानी टेकल्या,
पण उथळ जे पायवे ते खोल नाही आजही.
(२ रा शेर)
पददलित लोकांत आपण मुख्यधारा आणली,
भीमबा तुमच्या लढ्याला तोड नाही आजही.
(३ रा शेर)
फार मोठी गोष्ट ही की सान मोठे शेत्करी,
भेद असुनी एक आहे दोन नाही आजही.
(अंतिम शेर)
कायद्याने शेत्कऱ्यांचे हात आहे बांधले,
अन्यथा हा शेत्करी लाचार नाही आजही.
(मक़ता)
हा असाही पावसाळा पाहतो 'रविपाल' मी,
दाटले आभाळ काळेभोर नाही आजही.
°°°
वृत्त: देवप्रिया/कालगंगा
प्रतिक्रिया
कुणाला जोश आहे आणि कुणाला होश
कुणाला जोश आहे आणि कुणाला होश आहे ते काही मला माहिती नाही सर, पण तुमची गझल मला नक्कीच बे -होश करून गेली.
धन्यवाद राजेश,
आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
बढिया गझल डॉ साहेब!!!!
धन्यवाद धिरजभाऊ
आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने