या धरेणे जे दिले ते हे जिव्हाळे नेत
पावसाळे देत गेले अन उन्हाळे नेत
शिंपूनी मी आसवांना सिंचलेले शेत
दाटल्या ओल्या पिकांवर आखले मी बेत
याश्रमाला मोल नाही भाव नाही कोणता
मुल्य माझे पाहतांना पाहतो माझे मी प्रेत
आवळे ते देत गेले अन भोपळे ते नेत
मेघ ही फसवे निघाले आकाश करीती घात
मास खाणारी गीधाडे उतरली बघ दारात
या तरुला दान नाही मान नाही कोणता
चित्र माझे लुटलेले पाहतो माझ्या घरात
ओहळे ते देत गेले अन सोहळे ते नेत
थांबली लक्ष्मी कधी ना सद-याच्या खीश्यात
राहीली ना धग अता या लोंबत्या मिश्यात
या दु:खाला पंख नाही अंक नाही कोणते
गणित माझे चुकलेले सरकारी दप्तरात
कर्म जे जे देत गेले अन दैव ते ते नेत
रोग दारिद्र्याचा भीनला कष्ठल्या उरात
ग्वाही माझे रक्त देई वाळल्या शीरात
या झ-याला वाट नाही घाट नाही कोणता
जीव माझा अडकतो या नीयतीच्या पाश्यात
बगळे जे जे देत गेले अन कावळे ते नेत
