नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेती
अजोबा होते तेंव्हा
मामा ही बोलवायचा
बैलगाडीत बसवून
शेतात घेवून जायचा...
शेताच्या बाजूला
खळाळते नदी
रेतीच्या झीऱ्यात
ओंजळीने प्यायचे पाणी...
धुणे ,अंघोळ, डुंबणे
नदीतच व्हायचे
शेताच्या बांदावर
कपडे वाळायचे.....
कांदा , ठेचा भाकर
भूक किती वाढवायचा
झाडाखाली गारेगार
अमृत ढेकर यायचा....
डोलणारे शेत पाहुण
मन कसं झुलायचं
अनवाणी पायाने
अख्ख रान तुडवायचं...
माळव्याची चव न्यारी
हुरडा तर लयच भारी
हरबऱ्याचा टहाळ अन्
भाजलेली कणिस मक्याची...
शेतात काम करताना
थकवा न कधी यायचा
होई काम खेळता खेळता
सुगंध दरवळे घामाचा...
खुरपणी अन् निंदणी
पाथ आपली संपवायची
स्टार्टर सुरू करून पाही
मौज पाटाच्या पाण्याची...
शेतातला दिवस कसा
लवकर हो मावळायचा
स्वप्नात येवून मग असा
पुन्हा पुन्हा हसवायचा...
आज फोनवर सांगतो मामा
आईला पाठव सही घ्यायची
आजोबा नाही राहीले आता
त्याला शेती आहे विकायची....
किशोर झोटे,
औरंगाबाद
प्रतिक्रिया
काव्य स्पर्धा २०१७
पाहिल्यांदाच काव्यलेखन स्पर्धात सहभागी होत आहे.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने