नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कधी येणार आच्छे दिन........?
मनात अपेक्षांचे स्वप्न रंगवुनी
गादीवर बसविले तुम्हाला आम्ही
भारतात कमी अन् विदेशातच नेहमी
विदेशातून एक तरी जनकल्याणकारी योजना आणा नवीन
अन् खर्र सांगा साहेब कधी येणार हो आमचे आच्छे दिन..?
सत्तेवर येताच पडली तुम्हाला पंधरा लाखाची भूल
मंदिरे बांधल्याने पेटत नाही गरीबांच्या झोपडीतील चुल
पेट्रोल महागले, डिझेल महागले, गरीबांचे इंधन महागले केरोसीन
अन् खर्र सांगा साहेब कधी येणार हो आमचे आच्छे दिन...?
कर्जाला कंटाळून शेतकरी करतो आत्महत्या
विकासांच्या वाचता तुम्ही खोट्याच पोथ्या
बॅंकांचे व सावकारांचे आम्हावरील कधी फेडणार रिन
अन् खर्र सांगा साहेब कधी येणार हो आमचे आच्छे दिन...?
शेत मालाला हमी भाव न दिल्याने शेतकरी झाला कंगाल
उद्योगपती व्यापारी झाले मालामाल
बिनपगारी शिक्षकांचे तर विचारुच नका हाल
पगार त्यांना सुरू करा जाईल त्यांचा शिन
अन् खर्र सांगा साहेब कधी येणार हो आमचे आच्छे दिन...?
एम.फिल,पि.एचडी करून विद्यार्थी बेकार
बोगस पदव्यावाले मात्र मंत्रीपदावर स्वार
बेकारीमुळेच मुलांचे होत नाहीत लगीन
अन् खर्र सांगा साहेब कधी येणार हो आमचे आच्छे दिन...?
जी.एस.टी, नोटाबंदीने कंबरडे मोडले, महागाईचा वाढला भस्मासुर
मंत्र्यांकडे मात्र वाहतोय पैशांचा महापूर
पैशाची उधळण करीत फिरता
अमेरीका, जपान, इंग्लंड, रशिया व चीन
अन् खर्र सांगा साहेब तुमच्या सारखे आमचेही कधी येणार हो आच्छे दिन......? कधी येणार हो आच्छे दिन......?
कवी
बालाजी कांबळे
पंचशील नगर परळी वैजनाथ
ता.परळी वै.जि.बीड ४३१५१५
मो.नं-९८६०८०६७४७
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने