स्पर्धेसाठी प्रवेशिका पद्य विभाग छंदमुक्त कविता
शेती आणि कोरोना
*****************
हेलावले अंतर माझे
दोन दिवसात आठ शेतकरी
आत्महत्या जीवनास मुकले
कितीक भूमिपुत्र माझे
वरुण राजाची वक्रदृष्टी
अच्छे दिनाची सरकार भरती
नियतीच दुष्टचक्र हे संपेल केव्हा
आत्महत्या दाबून भ्रष्टाचार पांघरती
पिक कर्ज सात बारा
बी-बियाणांचा वाढतो कर्ज पसारा
बँक प्रकरणे सर्व कागदी
घोड्यांचा लागतो मागे ससेमिरा
पाऊस पाण्याची आळवणी
बळीराजाला नडते आणीबाणी
अर्धे कोरडे अर्धे सुखं ओलं रानं
नेहमीच येती संकट दुबार पेरणी
रासायनिक खते कीटकनाशके
मजुरीचे दर बिल अन वीजटंचाई
घसरलेले भाव आणि दलालांची लूट
कायमच सोबतीला असे बेकारी महागाई
उन्हातान्हात राबून बळीराजानं
यंदा शेतीत माल पिकवला
घामाचे मोती मातीत पेरले
कोरोनानं मात्र माल घरातच सडवला
वाहनं केली बंद जिल्ह्याच्या सीमा सील
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
कसा पोहोचवायचा माल गोदामी
बघून मालाला डोळ्यात येई पाणी
सौ. रजनी मदन ताजने डहाणू.
प्रतिक्रिया
शेती आणि कोरोना
शेती आणि कोरोना
::::::::::::::::::::::::::::
पृथ्वीवरचा भगवान शेतकरी
सर्वांचा तो आहे पालन हार
शेतकरी म्हणून जीवन जगून बघा
भोळा भाळा गरीब असे निर्विकार
राब राब राबुन काळ्यामातीत
हाडाची काडे करून धान्य पिकवतो
रक्ताचे पाणी करून दिवस-रात्र
साऱ्या जगाचे पालन पोषण करतो
आज कोरोनाच्या विळख्यात
सारे सारेच जग अडकले
हातचे काम सोडून सारेच
हतबल होऊन घरात बसले
मंदिर मज्जित कारखाने दुकानं
सारेच बंद देश लाॅकडाऊन झाला
मात्र शेती त्याची नाही पडली बंद
अभिमानाने पोसतो तो साऱ्या जगाला
नसला जरी मालाला भाव
अव्वाच्या सव्वा दलाल लुटू लागले
कोरोना ने सारेच झाले लाॅकडाऊन
नाही मानली हार किती ही संकट आले
पाऊस पाण्यावर त्याचे जीवन
सस्य् श्यामल सारे रानं केले
त्याने कोरोना वर मात करून
त्याचे हिरवे शेत आज डोलू लागले
सौ. रजनी मदन ताजणे डहाणू.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने