नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वादळांशी युद्ध लढण्या, पक्षी उडाले होते
पंख तयांचे पार,छाटून निघाले होते
शिवाराचे होऊनि टक्कल
त्याची धावपट्टी झाली
दिल्ली-मुंबईचे राजहंस आले
आता 'कासवास' पळायला शिकविनार होते
पुढे 'कासव' मागे विमान होते
देह 'अपंग' पडला खाली
पुढे आत्मा 'कासवाचा'
मागे विमान होते
बघे ते सारे,'उसेन बोल्ट' होते
अभिनयवाले 'तुफान नट' होते
पांढऱ्या गाड्यांनी फिरत गर्र....होते
भ्रष्टाचाराचा काळा सोडत धूर....होते
डायनाँसोर बनुनि, परत ये एकदा !
अस्तित्व तुझे दाखवायला!
चातकासारखी वाट बघणाऱ्या,
या एका 'अभयमित्राला' भेटायला
शब्दाचा अर्थ-
वादळांशी युद्ध लढणे - संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करणे या अर्थाने
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
***************************
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त!! राजेश
Thank you sir
Thank you sir
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने