Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन

४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

सिंहावलोकन - भाग १
 
            दरवर्षी २ दिवसाचे असणारे संमेलन यावर्षी १  दिवसाचे असल्याने व कार्यक्रमही भरगच्चं असल्याने समारोप रात्री १० च्या आत संपवणे याबद्दल माझ्यावर प्रचंड दडपण होते. रात्रीच्या निवासाची सोया आपण करू न शकल्याने सहभागी प्रतिनिधींना त्यांची स्वतःची व्यवस्था करणे सुलभ आणि शक्य व्हावे म्हणून कोणत्याही स्थितीत रात्री १० वाजताच्या आत समारोप करणे ही आपली नैतिक जबाबदारी होती. नियोजित कार्यक्रमानुसार पहिल्या सत्राची सुरवात सकाळी ९.३० वा करायची होती पण दिवसाचा पहिला स्लॉट असल्याने सभागृह व्यवस्थापनाच्या दिरंगाईने व्यासपीठ सजवायला १०.४५ वाजले. सभागृह व्यवस्थापनाने व्यासपीठ सजवायला दिरंगाई केली हे खरे असले तरी मुंबईची पराधीन व यंत्रावलंबित जीवनशैली आणि मुंबईच्या मर्यादा लक्षात घेता ही दिरंगाई क्षम्य आहे, असे माझे मत आहे. पण कार्यक्रम तब्बल सव्वा तास उशिरा सुरु झाल्याने  माझ्यावरील दडपण आणखी वाढले. त्यामुळे वेगवान गतीने कार्यक्रम उरकण्यासाठी दोन सत्रांमधील अंतर संपवावे लागले. प्रत्येक सत्रातील स्वागत व स्मृतिचिन्ह प्रदान समारंभ वेगवान गतीने उरकावा लागला. ही बाब अपरिहार्य होती.
 
            उदघाटन सत्र ठीक ९.३० ला सुरु करायचे आहे त्यामुळे वेळेच्या आता सभागृहात पोहचा अशा सक्तीच्या सूचना असल्याने आपले उदघाटक, संमेलनाध्यक्ष, प्रमुख पाहुणे वेळेवर पोचले. मकरंद अनासपुरे तर ठीक ९.१५ लाच दाखल झाले. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई हा माझ्यासाठी आणखी एक नवीन कार्यक्रम निर्माण झाला. कितीही धावपळ असो, कामाचे दडपण असो; आयोजकाला किमान काही जबाबदाऱ्या पार पाडण्यात कसूर करता येत नाही. त्यामुळे आधीच वाढलेले दडपण आणखी वाढत असतेच आणि त्याला काहीही पर्याय नसतो. मात्र त्यामुळे पुढील कार्यक्रम आखणीत काही चुका याची शक्यता वाढत असतेच.
 
            उपस्थितीबद्दल मी समाधानी आहे. माझ्या प्राथमिक आकलनानुसार प्रथम सत्राला ७०० आणि समारोपीय सत्राला २०० प्रतिनिधिंची उपस्थिती असेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात भोजनाच्या पत्रावळीच्या संख्येनुसार दुपारी ५६५ तर रात्री १९४ प्रतिनिधींची उपस्थिती होती. मुंबईचे दूरवरचे अंतर, रेल्वेची अनुलब्धता आणि मुक्कामाची सोय नसणे यामुळे थोडी संख्या रोडावली पण स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून  ५६५  प्रतिनिधी संमेलनाला येणे, हे संमेलन प्रचंड यशस्वी झाल्याचे निदर्शक असल्याचे माझे मत आहे.

- गंगाधर मुटे
****************

 

सिंहावलोकन - भाग २

प्रास्ताविक भाषण

        चौथ्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील माझ्या भाषणाची चित्रफीत बघितली. स्वाभाविकपणे स्वतःच्या त्रुटी स्वतःला लक्षात यायला लागतात. त्या भाषणात मी उपस्थित केलेले मुद्दे किती लोकांना कळले असतील, देवच जाणे!
        कामाच्या धबडग्यात चिंतनाला अथवा पूर्वतयारीला वेळ न मिळाल्याने उभं राहिल्यानंतर जे सुचले ते बोललो. पण मर्यादित वेळेमुळे व वेळेचे बंधन पाळण्यामुळे बहुतांश मुद्दे अत्यंत त्रोटकपणे आलेले आहेत. एकेक मुद्दा सविस्तर घ्यायचा म्हटले तर त्या भाषणाला किमान एक तास तरी वेळ हवा होता. मी आयोजक किंवा सर्वेसर्वा असलो तरी प्रास्ताविक करणाऱ्याने किती वेळ बोलावे, याचे मला भान होते. अध्यक्षांच्या भाषणापेक्षा प्रस्ताविकच जास्त लांबीचे झाले तर ते "जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा" या वर्गवारीत तर जातेच पण चेष्टेचा विषयही होत असते.
        पण मी मांडलेले काही मुद्दे शेतकरी साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे होते. पण मुद्दे नवीन होते आणि मुद्याचा विस्तार न केल्याने त्यांचे अत्यंत त्रोटकपणे प्रकटीकरण झाले. त्यामुळे ते किती लोकांना कळले असतील,असा स्वाभाविक प्रश्न मला पडलेला आहे.
        शेतकरी साहित्य चळवळीची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल याविषयी भाष्य होणेही अत्यंत महत्वाचे आहे. ही भूमिका आयोजकालाच पार पडायची असेल तर पुरेसा वेळ मिळणेही आवश्यक आहे.
भविष्यात यातून मार्ग कसा काढायचा, प्रास्ताविकाऐवजी बीजभाषण करायचे कि काय, हा विचार करावा लागणार आहे.  
 
- गंगाधर मुटे  
*********************
 
४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

सिंहावलोकन - भाग ३

शेतकरी चळवळीची कार्यपद्धती पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालत असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय म्हणून आपल्याला वेगवान आणि कमीतकमी मनुष्यबळाचा वापर करून कार्य सिद्धीस नेता येते.
प्रतिनिधी नोंदणीसाठी आपण तीन पर्याय ठेवले होते. ऑनलाईन, ईमेल किंवा मनिऑर्डर. तीन पर्याय असतानाही अनेकांनी आम्हाला हे जमत नाही, आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी येऊनच नोंदणी करू असे कळवले. मला अजूनही कळले नाही की, पोस्टात जाऊन मनिऑर्डर न करता येण्यासारखे काय आहे? शिवाय संमेलनाला जो खर्च येतो तो संमेलन पार पडण्याआधीच येतो. मग वेळेवर पैसे मिळणार असतील तर त्याचा उपयोग तरी काय? शेतकरी साहित्य चळवळीला कुणीही गॉडफादर नाही, कुणीही प्रायोजक नाही. लोकवर्गणीच्या माध्यमातूनच हि साहित्य चळवळ आपण पुढे नेत आहोत, असे वारंवार सांगूनही प्रतिभासंपन्न सारस्वतांना इतके सोपे मराठीतील वाक्य कळत नसेल तर त्यांना भविष्यात सोबत घेतलेच पाहिजे हेही अनिवार्य नाही, या निष्कर्षाप्रत येण्यास काहीही हरकत असू नये.
प्रतिनिधी नोंदणीच्या माध्यमातून फार मोठा निधी उभा केला जाऊ शकत नाही. प्रतिनिधी नोंदणीच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या तुलनेने पहिल्या संमेलनात १.५ टक्का, दुसऱ्या संमेलनात २ टक्के, तिसऱ्या संमेलनात २ टक्के तर मुंबईच्या ४ थ्या संमेलनात ५ टक्के निधी गोळा झाला आणि तरीही काही साहित्यिकांना आम्ही प्रतिनिधी फी शुल्क भरून साहित्य चळवळीवर उपकार करतो आहे, अशी त्यांची भावना होत असेल तर एकंदरीत आत्मपरीक्षणाची गरज आहे आणि पुढील वाटचाल करताना काही साहित्यिकाच्या स्वभावशैली मध्येही बदल घडवून आणण्याचे काम शेतकरी चळवळीला हाती घ्यावे लागेल.
आम्ही सारस्वत आहोत, आम्हाला सन्मानाने निमंत्रित करा, आम्ही प्रतिनिधी शुल्क भरणार नाही अशी भावना काही साहित्यिकांची असेल तर ते गैर नाही. पण आपण सन्मान कुणाला मागतो आहोत, याचे भान किंवा इतके छोटेसे व्यावहारिक ज्ञान सारस्वतांना का असू नये? अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ ही कुणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही. सरकारी अनुदानावर किंवा बड्या धेंडाकडून भरमसाठ देणगी मिळवून त्यांच्या ताटाखालचे मांजरही होणारी नाही. लोकवर्गणी आणि आत्महत्येच्या पायरीवर उभा असलेल्या आणि आर्थिकस्थितीने पुरेपूर खंगलेल्या शेतकऱ्यांकडून निधी गोळा करत चालणारी साहित्य चळवळ आहे. अशा स्थितीत काही सारस्वतांचे लाड पुरवण्यासाठी मिळालेल्या निधीचा दुरुपयोग करणे किंवा शेतकरी समाजाला कवडीचा उपयोग नसलेल्या स्वनामधन्य, आत्मकेंद्री व स्वतःचीच आत्मप्रौढी जपणाऱ्या काही साहित्यिकांवर निष्कारण निधी का उधळायचा याचेही विचारमंथन होणे गरजेचे आहे.
शेतकरी चळवळ म्हणजे साहित्यिकांच्या पालखीचा भोई नव्हे की त्यांनी या साहित्य चळवळीकडून पालखीची अपेक्षा धरावी. उलट साहित्यिकांनी या साहित्य चळवळीच्या पालखीचा भोई होण्यात धन्यता मानली पाहिजे. त्यासोबतच अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ ठराविक लोकांचा कंपू बनू नये तर ही लोक चळवळ व्हावी, अशीही खूणगाठ मनाशी बांधून वाटचाल झाली पाहिजे. इथे व्यक्तिगत आशाआकांक्षा, मानमतराब याला फारसे महत्त्व असू नये. या साहित्य चळवळीकडे साहित्यिकांनी आपली आई म्हणून बघितले पाहिजे.  
ज्या साहित्यिकांना इतके समजते , उमजते आणि प्रत्यक्ष आचरणात आणता येते त्यांना घेऊनच पुढील वाटचाल केली तरच ही शेतकरी साहित्य चळवळ आपले निर्धारित उद्दिष्ट गाठून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणू शकेल अशा कटिबद्ध शेतकरी साहित्यिकांची पिढी घडवू शकेल, हेही प्रकर्षाने समजून घेतले पाहिजे.
 
- गंगाधर मुटे
********************
Share

प्रतिक्रिया

 • Ravindra Kamthe's picture
  Ravindra Kamthe
  सोम, 05/02/2018 - 21:04. वाजता प्रकाशित केले.
  नमस्कार मुटे सर.
   
  एकंदरीत चौथे शेतकरी साहित्य संमेलन व्यवस्थितपणे पार पडले.  तुमच्या व सहकाऱ्याच्या अथक परिश्रमांना यश आले हे मात्र नक्की.  मी पहिल्या संमेलना पासून नियमितपणे सर्व संमेलने पहिली आहेत, फक्त गडचिरोलीला यायला जमले नाही.  वर्ध्यातून सुरु केलेली शेतकरी सारस्वतांची ही दिंडी ह्या वर्षी तुम्हीं चक्क राज्याच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत करण्याचे ठरवले तेंव्हाच तुमच्या ह्या अतुलनीय कार्यास मी सलाम केला होता आणि आजही करतो आहे.  गेले दोन तीन दिवस मी आपल्या समूहावर चाललेली चर्चा वाचतो आहे. सकारात्मक दुर्ष्टीने उचलेले प्रत्यके पाऊल हे आपल्याला प्रगतीपथाकडेच घेऊन जाते हे नक्की. तसेच काहीसे ह्या संमेलनाबाद्द्ल मला वाटते.  मुंबईत असूनही ह्या संमेलनास चागली उपस्थिती होती. तसेच माध्यमांनीही खूपच चांगली दखल घेतली त्यामुळे शेतकरी साहित्य चळवळीचे उद्दिष्ट्य काही अंशी साध्य झाले आहे असेच म्हणावयास हवे.  
  सर त्रुटी तर प्रत्येक नियोजनात असतात.  दरवेळेस आपल्याकडून अपेक्षा वाढतच जाते.  हे आपल्या गेल्या तीन संमेलनाच्या यशाचे गमक आहे.  तुमचा व्यासंग खूप चांगला आहे.  तुम्हांला माणसे जोडण्याची कला उपजत आहे तसेच तुमचे साहित्यात विशाल कार्य आहे.  तुमच्या ह्या अथक परिश्रमांमुळेच मला खात्री आहे की उत्तरोतर शेतकरी संमेलनास यश हे निश्चितच मिळणार आहे आणि आपले उद्दिष्ट्य साध्य झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे.
  मला जो काही मान सन्मान आपण देता आहात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे.
   
  कळावे.
  आपला स्नेहांकित.
  रविंद्र कामठे
  पुणे. 

  आपला विश्वासू,
  रविंद्र कामठे
  पुणे
  भ्र. न. ९८२२४ ०४३३०
  इमेल – ravindrakamthe@gmail.com

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 05/02/2018 - 22:38. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद सर! अगदी प्रारंभापासून आपण शेतकरी साहित्य चळवळीला बहुआयामी आधार दिला आहे. आज जे यश मिळून शेती साहित्याची ध्वजा उंचावत आहे त्यात आपले योगदान महत्त्वाचे आहे. Ramram

  शेतकरी तितुका एक एक!

 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  मंगळ, 06/02/2018 - 19:10. वाजता प्रकाशित केले.

  सर, संमेलन यशस्वी झाले. आपण घेत असलेले परिश्रम हे अतिशय जिकरीचे आहेत. यापूढे शक्य असल्यास संमेलन स्थळावरील काही जबाबदाऱ्या आमच्यावरही टाकून बघा. आम्ही आपणास बिलकुल शिकायतीचा मोका देणार नाही. तसेच आम्हालाही संमेलनासाठी काही करता आल्याचे समाधान लाभेल. एकंदरीत सर्व काही छान पार पडले हे अत्यंत महत्वाचे. आता यापूढे आपण संयेलनांतर्गत सत्रांची विषेश काळजी घेवून ते कशे आनखीन सुंदर आणि गोड होतील ह्याकडे अधीकचे लक्ष देवूयात. आपणास संमेलनाच्या खुप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सर!

  Dr. Ravipal Bharshankar

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 06/02/2018 - 19:17. वाजता प्रकाशित केले.

  आपले सहकार्य सदैव मिळतच आले आहे. आणखी जबाबदारी स्वीकारण्याची तुमची इच्छा सुखावून गेली. पुढील खेपेस आपले सहकार्य महत्वाचे ठरेल, याची खात्री आहे. Ramram

  शेतकरी तितुका एक एक!

 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  मंगळ, 06/02/2018 - 20:33. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद सर!

  Dr. Ravipal Bharshankar

 • विजय पाटील's picture
  विजय पाटील
  बुध, 07/02/2018 - 11:04. वाजता प्रकाशित केले.

  वा वा. स्वताच स्वतःच्या त्रुटी शोधणे व त्या जाहीरपणे मांडणे यालाही मोठं मन लागत. बाकी लोकांनी ही संमेलनातील त्रुटींचा पाढा वाचला तो सुद्धा तुम्ही नजरंदाज न करता आत्मसात केला. संमेलन कितीही मोठ असू द्या की,छोट. 1 दिवसाच असो की, 3 दिवसाच. त्रुट्या या राहणारच कारण ज्याची त्याची बघण्याची दृष्टी वेगळी आहे.
  सर्व संमेलन छान झाले. कुठंही नाव ठेवायला जागा नाही पण मला त्रुटींच काढायची आहे तर मी सांगेन जेवण बरोबर नव्हतं याला काय अर्थ आहे? अहो आपल्या घरी लग्न असत तेव्हाही 500 पाहुणे जमतात तेव्हा काहींना काही त्रुटी राहून जातात हे तर संमेलन आहे. येथे 700 ते 800 लोक जमतात संमेलनाची 70 ते 80 टक्के जबाबदारी एकटे मुटे साहेबच सांभाळतात. तरी लोक त्रुट्या काढतात. त्रुट्या जरूर काढाव्यात पण ही गोष्ट अशी झाली ती तशी झाली असती तर अधिक चांगली झाली असती असे मला वाटते, अस सांगून एकंदरीत संमेलन छान झाले असे सांगितले असते तर अधिक चांगले झाले असते, असे मला वाटते. या मागे कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. गेली चारही संमेलन मुटे सरांनी यशस्वीपणे हाताळली त्याला तोड नाही. आपण सर्वजण मिळून त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडूया व पुढील संमेलनात ज्या काही त्रुट्या ज्यांना ज्यांना आढळल्या व त्यांनी निदर्शनास आणून दिल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी त्याच लोकांनी मुटे सरांना मदत करू या. अशी मी वैयक्तिक रित्या विनंती करतो व थांबतो.

 • विजय पाटील's picture
  विजय पाटील
  गुरू, 08/02/2018 - 01:24. वाजता प्रकाशित केले.

  अगदी बरोबर मुटे सर आपले आकलन अगदी बरोबर आहे काही सारस्वत जसे तुमच्या मुलाच्या लग्नात आल्यासारखे वावरत होते शेतकरी साहित्य संमेलन हे आपलं घरचे च काम आहे हे संमेलन इतर संमेलनासारखे कुणाच्या मेहेरबानीवर चालत नसून आपल्याच तुटपुंज्या वर्गणीवर आणी मनापासून देणगी देणाऱ्या दात्यांवर चालत आहे याची जाणीव ठेवली पाहिजे सारस्वतानी मान सन्मान हा विषय च नको.

 • Nilesh's picture
  Nilesh
  मंगळ, 13/02/2018 - 14:15. वाजता प्रकाशित केले.

  संमेलनाबाबत च्या सर्व प्रतिक्रिया वाचल्या
  संमेलन यशस्वी झाले...
  मुटे सर आपले अभिनंदन...

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 16/02/2018 - 04:21. वाजता प्रकाशित केले.

  सर्व प्रतिक्रिया वाचल्या. संमेलन छान झाल्याचे प्रतिक्रियेवरुन कळले. Thumbsup
  माहितीबद्दल सर्वांचे धन्यवाद. Thumbs-Up

 • admin's picture
  admin
  रवी, 18/02/2018 - 21:59. वाजता प्रकाशित केले.

  विचार व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! Ramram