पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
ती स्वप्नसुंदरी
'सात' खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
जोपासतो अशी ही आम्ही समानता राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
जोडे सजावटीला एसी-कपाट ते भाजी-फ़ळांस जागा, मात्र उघड्यावरी
मंगळ कह्यांत आला, कक्षेत तारका भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसे आकार घटत चोळी, जाते सरासरी
शेती करून मालक होणेच मूर्खता सन्मान मोल आहे कर ’अभय’ चाकरी
गंगाधर मुटे ………………………………….……………… वृत्त- विद्युल्लता
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.