नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझ्या नवीन काव्यसंग्रहातील कविता सादर करतो. अवकाळी पाउस आणि गारपिटीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या भावनानांचे प्रतिबिंब शब्दांकित करण्याचा एक प्रयत्न ..
|| तुझीपण काही खैर नाही नशिबा आता ||
किती पाडशील चरे काळजाला नशिबा आता
नक्षत्रांचे देणेही देऊन थकले नशिबा आता ||
कोणत्या जन्माचे पाप मी फेडतो आहे
भोग हे कधी संपणार नशिबा आता ||
दु:खातही सुख मी कुठे शोधिले होते
सुखासाठी माझी माघार नशिबा आता ||
देताना तू छप्पर फाडून देतोस म्हणे
ओंजळीत मावेल इतकेच दे नशिबा आता ||
आकाशात पहिले चांदणे टिपूर होते
आसवांचे मोती दान दे नशिबा आता ||
भावनांना माझ्या कुठे होतात वेदना
संवेदना मनाच्या गतप्राण नशिबा आता ||
एक डाव भुताचा मी मांडून पहिला खरे
तुझीपण काही खैर नाही नशिबा आता ||
रविंद्र कामठे, पुणे
१५ मार्च २०१५.
प्रतिक्रिया
व्यथा छान मांडलीय
व्यथा छान मांडलीय
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर.
माझ्या परीने मी आपल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
नमस्कार.
रविंद्र कामठे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
पाने