Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




तरी म्हणती राजा

लेखनविभाग :: 
छंदमुक्त कविता
लेखनाचा विषय: 
शेती आणि शेतकरी

तरी म्हणती राजा

सुजलाम् आहेना, सुफलाम् आहेना, माझ्या भारत देशा
साहित्य आहेना, चळवळ नाहीना, वळवळ गाजावाजा
सत्कार आहेना, सोहळे आहेना, अनेका-अनेक खाजा
तुझा वाजवला बाजा, कुणी येईना काजा (२)
तरी म्हणती राजा, तुला तरी म्हणती राजा II 1 II

खत आहेना, फवारे आहेना, पटीने पैका मोजा (२)
लूट जाईना, भाव नाहीना, बी येईना काजा,
पुन्हा बी येईना काजा,
भिकारी बळी माझा, झाला भिकारी बळी माझा
तरी म्हणती राजा, तुला तरी म्हणती राजा II 2 II

दलाल आहेना, गरिबी जाईना, माल तुझा रे ताजा
पांढरे सोने, भाव मिळेना, हमीभावाचा बाजा
लुटारुं मंडी, भुलथापी रंडी, लुटलारे बळी माझा (२)
तरी म्हणती राजा, तुला तरी म्हणती राजा II 3 II

फॅशनेबल पोट्ट, तुटका दरवाजा, पोट्टी लग्नाची आहेना
घर तुह्य पडकं, कवेलु फुटले, तडकेल रे आईना
गावची शाळा टुकार केलीना, इंग्रजी शाळा भिकार केलीना,
हिनकस रे दर्जा, वाढीस तुझ्या कर्जा, नेई वाढीस तुझ्या कर्जा.
तरी म्हणती राजा, तुला तरी म्हणती राजा II 4 II

कर्जमाफी देती - - - -, सरडे चळवळीस डरती - - - -
आश्वासने फळेना - - -, यांची आश्वासने फळेना
मरूना देती - - - -, जगू ना देती - - - -
सलाईन तुला कळेना, हे सलाईन तुला कळेना
आर्त तुझे रे - - - - (२) भिडे ना काळजा,
भाड्यांच्या भिडेंना काळजा
तरी म्हणती राजा, तुला तरी म्हणती राजा II 5 II

चांदणे शरदाचे होते - - -, मकरंद आहे नाना - - - -
योद्धा किसान होताना - - -, तू योद्धा किसान होताना
आत्महत्या ना करूना - - - (२), हत्या तुला जमेना - - - -
चळवळीत ये ना - - - -, तू चळवळीत येना - - - -
तापत नाही तुझा भेजा (२), एकीने शपथा घेजा,
तुम्ही एकीने शब्दा घेजा, एकीने शपथा घेजा !
होशील तू रे राजा, मग होशील तू राजा . . (२) II 6 II

सेवानिवृत्त प्राध्या.
डॉ. उपेंद्र बळवंत महात्मे
कळमेश्वर, जि. नागपूर (म.रा.),
992371799