
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*शिर्षक:- विठूराया*
दिनरात चालतो हा
पंढरीचा वारकरी
आहे दु:खितांचा वाली
कष्टकरी शेतकरी.....१..
अन्न धान्याचा सागर
राब राब राबूनीया
भरी भक्तांची घागर
माझा हाच विठूराया..२..
करी विश्वाचा उध्दार
नाही कधी मोहमाया
हाल हाल सोसूनही
दिसे समाधानी काया...३...
नसे शेतीत उत्पन्न
देई वर्षी शेतसारा
कर्ज भारी डोक्यावर
नाही कोरा सातबारा....४....
आहे निरंतर उभा
बळीराजा विटेवरी
"बंदी" मांगतोय आता
ठेव कृपा जगावरी....५..
*एम.ए.रहीम(बंदी) चंद्रपूर*
संपर्क क्रमांक *९३७०१३७२०२*