Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




विरोचनाचा पुत्र अन्नदाता

लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
विरोचनाचा पुत्र अन्नदाता
 
विरोचनाचा पुत्र तू
भक्त प्रल्हादाचा नातू तू
दैत्य वंशाचा उद्धारकर्ता
जगतविख्यात बळीराजा तू..१
 
असुरांचा राजा तू
विनयशील अन चारित्र्यवाण
इंद्रपद का डळमळू लागले
महाबली तू किती महान...२
 
 
दानशूरूपणात तुझा डंका
वचनपूर्तीत तू कधी न ढळला
बटूक वामनाचा कावेबाजपणा
पाहताक्षणीच तू ओळखला...३
 
यज्ञ मंडपी याचक रूपात
जगदपालक विष्णू आले
समजावणे व्यर्थ गेले गुरुचे
तेव्हा शुक्राचार्य कमंडलू आड लपले...४
 
ओम भवती भिक्षा देहीचा
संकल्प केला उदार बळीने
स्वर्ग ,पृथ्वी ,नरकास
तुच्छ मानले त्याने ...५
 
 
तीन पद जागा देऊन
संकल्पाने उतराई केले
पाताळात सुतल प्रदेश देऊन
श्रीहरी बळीचे द्वारपाल झाले..६
 
कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा
"पाडवा" अर्धा मुहूर्त येतो
इडापिडा टळो बळीचे राज्य येवो
प्रार्थनेचा या जयघोष होतो..७
 
शेतमाला भाव नाही ,हे धोरण
वामनाचे ,का ओळखत नाही?
लूट होते नेहमी जाळ्यात फसतो
तरी हितचिंतकाचे का ऐकत नाही..८
 
 
बहुजनपालक, क्षमाशील
बळीराजाची कीर्ती वाढो युगे युगे
कितीक शतके आली अन गेली
अन्नदात्याचीच कथा यामागे.....९
 
अजित सपकाळ अकोट
जि अकोला
९७६६२०१५३९
Share