नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंधू प्रेम.
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला पदराला ,
बंधूचा ग वाडा ,पांडुरंगाच्या शेजारला .
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला चोळीला ,
बंधूचा ग वाडा ,पांडुरंगाच्या आळीला .
पंढरीचा ग बुक्का ,माज्या लागला साडीला ,
सरदार माजा बंदू,साधू संताच्या जोडीला .
पंढरीला ग जातो ,बहिण-भाऊ आम्ही दोघ ,
आई-बापाच्या पुण्याईन ,तीर्थ घडल मानजोग .
पंढरीला ग जातो ,विठूरायाला भेटाया ,
संगतीला ग नेतो ,लाडक्या भाऊराया.
मालुबाई.
प्रतिक्रिया
मानजोग म्हणजे मनाजोग म्हनजे
मानजोग म्हणजे मनाजोग म्हनजे मनासारखे काय?
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर.
हो सर चुकुन मानजोग झालेय ,मनाजोग हे योग्य आहे.
स्त्रि गितातले भावविश्व खुपच
स्त्रि गितातले भावविश्व खुपच रम्य.... माझी बहिण आठवली..
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
पाने