
  नमस्कार !  ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे.  | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शीर्षक-- पोशिंदा
 साऱ्या जगाचा पोशिंदा
 शेतकरी   बळीराजा,
 कष्ट करीतो शेतात
 नाही निवृत्ती नी रजा.
 रात्रंदिन  करी  सेवा
 काळ्या माय माऊलीची,
 बीज  पेरुणी  मातीत
 कुस  उजवी  धात्रीची.
 स्वप्न पाही भविष्याचे
 येता पिक बहरूनी,
 पिक डोलता शिवारी
 सुखावतो मनोमनी.
कधी अस्मानी संकट
करी  धैर्याने सामना,
देश हा कृषीप्रधान
भाव मिळेना पिकांना.
नाही कुणा कळवळा
येथे नाही कुणी वाली,
कसा  होईल अशानं
शेतकरी  बलशाली.
सौ सुरेखा बोरकर
 नागपूर 
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने