नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मायीनं जगवली पिलं
आभाळाची अंगावर,उबदार शालं
झोपायला भुईची,गादी मखमलं
कर्जाखाली दबून बाप,कायमच गेलं
पंखाखाली घेऊन मायीनं, जगवली पिलं. Il धृ ll
डोंगराएवढं काळजात, घेऊनिया दुःख
पाडसाला सांभाळली, विसरून तहान भूक
लेकरासाठी जीवाचं ,करून घेतलं हालं
पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली पिलं. II १ ll
खांद्यावर घेऊन जू, शेत नांगरली
फाटलेल्या संसारावर ,पदर पांघरली
हिम्मतीने लढली माय ,न जाऊ देता कलं
पंखाखाली घेऊन मायीनं, जगवली पिलं. Il २ ll
उन्हामध्ये काम करून ,होई लाही लाही
संसाराचा ओढला गाडा, फक्त लेकरा पाई
घाम गाळून लेकराले, खूप शिकविलं
पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली पिलं. Il ३ ll
कष्ट करून करून अंगी ,राहिला नाही त्रानं
अचानक देहातून, निघून गेला प्राणं
आठवण येता मनी ,वाहे डोळ्यातून जलं
कारण पंखाखाली घेऊन मायीनं ,जगवली होती पिलं ll ४ ll
कवी
बा.सो.कांबळे
पंचशील नगर परळी वैजनाथ
ता. परळी वै.जि.बीड
मो.नं.9860806747
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
जगवली पिलं
छान
सुनिल बावणे
पाने