नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

पंचनामा (गझल)

Sagarraje's picture
लेखनविभाग: 
गझल

-- पंचनामा

मिळते न त्यास भाकर जो पोसतो जगाला
शोकांतिका म्हणावी की शाप जीवनाला

शेतात थेंब माझ्या पडतो कधीतरी पण..
डोळ्यात आसवांच्या धारा क्षणाक्षणाला

होते शिवार हिरवे जे काल मेघराजा
झाले तुझ्या कृपेने ते आज झाडपाला

करता कशास आता साहेब पंचनामा
गेलाय बाप माझा भेटायला ढगाला

केले प्रयत्न लाखो हाती तरी निराशा
ना पीक वाचले ना मालास भाव आला

- सागरराजे निंबाळकर, कल्याण
संपर्क :- ८८७९८९७७९७

Share
Layout Settings