आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो की, चुकीची व बेकायदेशीर माहिती प्रकाशित करणे, धमकी देणारे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे मेसेजेस पाठवणे हे आमच्या सेवाशर्तींनुसार निषिद्ध आहे. व्हाटसऍप बरोबर तुमचे नाते सेवाशर्तींमध्ये नमूद केले आहे, आणि जर वरील मसुद्यामध्ये आणि सेवाशर्तींमध्ये काही तफावत आढळल्यास सेवाशर्तींमधील मजकूर ग्राह्य धरावा.
Main page content
IT कार्यशाळा - व्हाटसऍपचा वापर व सुविधा : Part I - भाग-१४
व्हाटसऍपचा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी स्वतः व्हाटसऍप काय म्हणते ते आधी जाणून घेऊयात!
व्हाटसऍप वापरताना या गोष्टी ध्यानात ठेवणे उत्तम :
मेसेजिंग खाजगी ठेवा: वैयक्तिक चॅटसाठी आणि लहान ग्रुप्समधील चॅटसाठी वापरकर्त्यांनी त्यांचे खाते स्वतःच व्यवस्थापित करणे अपेक्षित आहे. लोकांची परवानगी मागा: एखाद्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधला असेल किंवा तुम्ही व्हाटसऍप द्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी स्वतःहून केली असेल, अशाच व्यक्तींना मेसेज पाठवावा. लोकांनी सर्वप्रथम तुम्हाला स्वत:हून मेसेज करावा यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर देणे उत्तम ठरेल. कोणी तुम्हाला त्यांचा फोन नंबर दिला असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मेसेज करावा. जसे की, प्रथम तुम्ही कोण आहात आणि त्यांचा फोन नंबर तुम्हाला कसा मिळाला हे त्यांना सांगा.
लोकांच्या इच्छेचा आदर करा: एखाद्या वापरकर्त्याने तुम्ही त्यांना मेसेज पाठवू नये असे सांगितले असेल तर, त्यांना तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकावे आणि त्यांना परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये सामील करण्यापूर्वी त्यांची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये गटामध्ये सामील केले आणि ती व्यक्ती स्वतःहून त्या गटामधून बाहेर पडली, तर त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
ग्रुप नियंत्रणे वापरा: आम्ही व्हाटसऍप ग्रुप्ससाठी 'केवळ ॲडमीनच मेसेज पाठवू शकतील' हे सेटिंग विकसित केले आहे. तुम्ही ॲडमीन असाल तर, सर्व सहभागी की केवळ गट ॲडमीनच ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे मेसेजेस बंद होण्यास मदत होते. फॉरवर्ड करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा: प्रत्येक फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजला आम्ही लेबल लावतो जेणेकरून, शेअर करताना लोक एकदा विचार करतील.
हे करू नका
नकोसे, ऑटोमेटेड आणि भरपूर मेसेजेस पाठवणे: व्हाटसऍप वरून भरपूर मेसेजेस, ऑटोमेटेड मेसेजेस पाठवण्याचा आणि ऑटो-डायल करण्याचा प्रयत्न करू नका. व्हाटसऍप हे मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि वापरकर्त्यांकडून येणारे रिपोर्ट्स या दोन्हीचा वापर करून नको असलेले मेसेज पाठवणारे खाते बॅन करू शकते. लोकांना आवडणार नाही अशा प्रकारे या वापरकर्त्यांशी पद्धतशीरपणे संपर्क साधणाऱ्यावरही अशा पद्धतीची कारवाई होते. शिवाय, अनधिकृत किंवा ऑटोमेटेड खाती किंवा ग्रुप्स तयार करू नका किंवा व्हाटसऍपच्या अनधिकृत आवृत्त्या वापरू नका.
जी संपर्क यादी तुमची नाही ती वापरणे: परवानगी शिवाय कोणाचाही फोन नंबर शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांमधून येणार डेटा वापरून (जसे की फोन नंबर्स विकत घेणे) व्हाटसऍप वापरकर्त्यांना मेसेज पाठवणे किंवा त्यांना ग्रुप्समध्ये सामील करणे, हे कधीही करू नका.
ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर करणे: वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केलेला असेल तरच त्यांना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मेसेजेस मिळतात. तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेजचा वारंवार वापर केला तर, तुमच्या या मेसेजेसची तक्रार केली जाण्याची शक्यता असते. ज्या खात्यांची अनेकवेळा तक्रार नोंदवली गेली आहे अशी खाती आम्ही ब्लॉक करतो.
आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो की, चुकीची व बेकायदेशीर माहिती प्रकाशित करणे, धमकी देणारे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे मेसेजेस पाठवणे हे आमच्या सेवाशर्तींनुसार निषिद्ध आहे. व्हाटसऍप बरोबर तुमचे नाते सेवाशर्तींमध्ये नमूद केले आहे, आणि जर वरील मसुद्यामध्ये आणि सेवाशर्तींमध्ये काही तफावत आढळल्यास सेवाशर्तींमधील मजकूर ग्राह्य धरावा.
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 15 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 11 hours 42 minutes ago
- 11 hours 50 minutes ago
- 12 hours 1 minute ago
- 12 hours 3 minutes ago
- 12 hours 5 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 217,989 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,916 |
| शुभारंभ | 134,903 |
| रानमेवा - भूमिका | 109,385 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,385 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,288 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,533 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,775 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,577 |
| उद्देश आणि भूमिका | 77,436 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,434 |
| विचारपूस | 71,699 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,713 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,725 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,288 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,536 |
| जात्यावरची गाणी | 56,000 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,394 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,037 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,345 |
