नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ओल
मंगळावर पाणी शोधन्यात
करोडो खर्च झाले !
टँकरवरच्या चेंगराचेंगरीत
काल निष्पाप जीव गेले !!
पावसाळ्यातही नद्यांमध्ये
आता लागत नाहीत झिरे !
खेड्यांतील लहान थोर
पाण्यासाठी वणवण फिरे !!
विकासाच्या साऱ्याच योजना?
ठरु लागल्यात फोल !
काळजात तरी कुठं आता
उरलीय सांगा ओल !!
पर्यावरणावर प्रबंध लिहून
तुम्ही मोकळे झालात !
दुष्काळावर अथांग चर्चा
शांत झोपी गेलात !!
ढोरमेहनत नशिबी इथं
पाठीला भिडलय पोट !
आमच्यावरील डिबेटमध्ये
ओठी बिस्लरीचा घोट !!
शेती मातीला सोडाच
इथं प्यायला ना धड पाणी !
अमृत महोत्सवी स्वातंत्र्याची
आयका करुण कहाणी !!
मलिदा सारा तुमच्या वाट्यात
कण्या चुरी आमच्या चायनीत !
पसाभर दाण्यांसाठी आमी
दिनरात जीवनभर लाईनीत !!
तुमची अलग संस्कृती बापा
सारा देश तुमच्या हवाली !
अन्याय अत्याचारा विरोधात
आमी पेटत्या ठेवू मशाली !!
आमच्या बापजाद्याईच्या कष्टाचं
थोडं तरी मोल करा !
आमिबी माणसंच हावोत
हा विचार सगळीकडे पेरा !!
गरजा जास्त नाहीत आमच्या
तरी जगणं उपेक्षितांच !
लेखणीतून उतरत राहो...
हे दुःख वंचीतांच !!
लेखणीतून उतरत राहो...
हे दुःख वंचीतांच !!
••••
अनिकेत जयंतराव देशमुख
(पाऊलखुणाकार कवी निवेदक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
MO. 9689634332
Email - anudesh25488@gmail.com