नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रानातला पाऊस
अन्नदाता तू जगाचा
पोर काळ्या तू आईचा
तुझ्याविना शेती नाही
तूच वाली रे जगाचा
ऊन पाऊस झेलून
पिकवितो तू ही शेती
डोंगर कर्जाचा घेऊन
सांभाळतो ही माती
घेऊन चालतो बळीराजा
उरी घाव दुष्काळाचा
तुझ्याविना शेती नाही
तूच वाली रे जगाचा
पाणी येते रे डोळ्या
हाल तुझे रे बघून
शेती रिकामी ही झाली
कर्ज कर्ज काढून काढून
पोरं तुझी शिक्षणाची
प्रश्न आहे संसाराचा
तुझ्याविना शेती नाही
तूच वाली रे जगाचा
नको घाबरू तू आता
येईल तुझापन वाली
आस नको रे सोडूस
नको चढू फासावरी
कळेल कधीतरी कुणा
जीव किती हा मोलाचा
तुझ्याविना शेती नाही
तूच वाली रे जगाचा
रानातला हा पाऊस
आहे तुझ्या सोबतीला
हार नको तू मानुस
आता घेर शासनाला
येईल नक्की तुझे दिसं
सुटेल प्रश्न तो शेतीचा
तुझ्याविना शेती नाही
तूच वाली रे जगाचा
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि. वर्धा
७३८७४३९३१२
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने