नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी संघटनेचा मुलभूत विचार स्वामी रामदेव बाबा व त्यांच्या सहकार्यांना समजावून सांगण्यासाठी दिनांक ८.८.२०११ ते १३.८.२०११ दरम्यान पतंजली योग पीठ, हरिद्वार येथे झालेल्या 'मंथन' शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने श्री वामनराव चटप यांच्या नेतृत्वा खाली एक गट गेला होता.
त्यांच्या सोबत सर्व श्री रवी देवांग, अनिल घनवट, राम नेवले, गुणवंत पाटील, जगदीश बोंडे, मिलिंद देशपांडे, सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजा देशपांडे. आदी नेते होते.
मंथन शिबिरात संघटनेचा विचाराची प्रभावीपणे मांडणी करण्यात आली. लवकरच देशातील सर्व शेतकरी संघटनाची एकत्र बैठक घेऊन समान कार्यक्रम ठरविण्यात येईल व शेतीमालाला रास्त भाव तसेच कर्जमुक्ती सहित अनेक मागण्यांसाठी देश पातळीवरील आंदोलन छेडण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
संदिप संधान
पाने