नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कुणी पेरलेत हे विषाणू?
कुणी पेरलेत हे विषाणू?
माणसा-माणसांत दुरी निर्माण करणारे!
माझ्या मातीत त्यांना रुजू होता येणार नाही
पिकांच्या मुळाशी झगडत राहू शकतील
अशी ताकद नाही त्यांच्यात...
या मातीतल्या पिकांची एकजूट
करोनाच्या विषाणूंचा नायनाट करेल अशी खात्री आहे
या मातीची सेवा करणाऱ्या लेकरांना!
थांबवू शकत नाहीत ते नांगरणी, पेरणी, खुरपणी आणि काढणी!
शेतातल्या ढेकळांतून अनवाणी पायाने चालणाऱ्या,
ऊन - पावसाची तमा न बाळगणाऱ्या आम्हा लेकरांना
काळ्या आईची सेवा करण्यापासून…
नाहीत थोपवू शकणार करोनाचे विषाणू!
ओल्या - कोरड्या दुष्काळातही खंबीर राहून
जगाला पोसण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात असते
हे आम्ही शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे पिढ्यान् पिढ्या
आम्ही मातीत जीव पेरतो
कुणी पेरलेत हे विषाणू?
जे जिवाला हानी पोहचवत आहेत!
- मुक्तविहारी
क्वार्टर क्र. जुने डी - ८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ, जि. बीड - ४३१५२०.
मो.९८६०९८५९११
ईमेल:muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
वाह....वाह...... अतिशय सुंदर
वाह....वाह...... अतिशय सुंदर रचना मुक्तविहारीजी
कुणी पेरलेत हे विषाणू?
जबरदस्त आशावादी रचना
मुक्तविहारी सर शुभेच्छा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद सर
मुक्तविहारी
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण