नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*गद्यलेखन स्पर्धेसाठी*
*भिंगरी*(कथा *)
या वर्षी दुष्काळ जरा जास्तीचा असल्यामुळे मामाने आपल्याकडच्या जवळपास साऱ्याच म्हशी विकल्या होत्या,फक्त दोन म्हशी ज्यांच्यात मामाचा जीव जरा जास्तच होता त्यात भिंगरी जिचे शिंगे भिंगरीसारखे गोल गोल होते म्हणून तिला ते नाव पडले आणि लंगडी जी मुळातच पांगळी होती अशा दोन म्हशी त्यांनी विकल्या नव्हत्या.त्याला कारणही तसेच होते भिंगरी म्हणजे अत्यंत हुशार आणि मानवी भाषा सहज समजणारी आणि लंगडी ही मुळातच लंगडी असल्याने तिला खरीददार भेटत नव्हते.
मामाकडे यंदाच्या उन्हाळ्यात राजू सुट्टीत आला होता,गोठ्यात फक्त दोनच म्हशी पाहून तो अवाक ! झाला होता," मामा इतक्या साऱ्या म्हशी होत्या,कुठे गेल्या", " आरं गुड्या,(राजूला लाडाने गुड्या म्हणायचे) आपल्यालाच पाणी नाय बघ प्यायला,जनावरांची हाल बघवले जात नाय रं लेका !! म्हणून टाकल्या विकून " मामा म्हणाला.
राजू जेमतेम ८ पास झालेला होता,भिंगरीच्या डोळ्यात पाणी त्याला दिसले ,तेवढ्यात तो म्हणाला,"मामा भिंगरी रडतीया रं, काय झाले असल तिला,तिच्या समद्या मैत्रिणी गेल्या म्हणून का रं!!" आता राजूला कळाले होते जनावरांनाही मानवाप्रमाणे भावना असतात,तो लगेचच भिंगरी जवळ गेला आणि तिच्या अंगा खांद्यावरून हात फिरवू लागला,तेवढ्यात भिंगरीही अंगाअंगात शहारली होती,आणि तिचा तो आर्त स्वर "हम्मा" राजूच्या कानात मात्र घर करून बसला होता,का रडत असेल भिंगरी तिची आई तिला सोडून गेली असेल का? की तिची बहीण? की मित्र ?काहीबी कळेनासे झाले होते,
रात्री सगळे झोपल्यावर राजू विचार करत जागाच होता, त्याला गोठ्यातन आवाज आल्यानं तो उठला आणि गोठ्याकडे गेला लंगडी झोपली होती पण् भिंगरी जागीच होती, तो पळत घरात आला आणि मामाला उठवू लागला " मामा भिंगरी जागीच आहे,ओरडती आहे,चला ना,ती काबर रडती आहे, बघा ना"
राजूने घरातल्या साऱ्यांनाच उठवले होते आणि तो गोठ्यात भिंगरी जवळ गेला होता, तेवढ्यात राजूला लंगडीच्या पायाजवळ काहीतरी दिसले,"अरे देवा, साप " राजू जोऱ्यात ओरडला,तो आवाज ऐकून सारे जागे झाले आणि गोठ्याकडे एकच गर्दी जमली,काही कळायच्या आतच पुन्हा आवाज आला
" मामा लंगडी बघ कशी करतिया"
"सापाने कात टाकली असेल" गर्दीतून कोणीतरी म्हणाले,
एकच आक्रोश भिंगरी का ओरडत होती त्याचा आत्ता कळाला होता,पण् कदाचित आता फार उशीर झाला होता,'लंगडीला दवाखान्यात न्यायला हवे' मामा म्हणाला,
गर्दीतून पुन्हा कुणीतरी म्हणाले "अरं एवढ्या रातचाला कोणती गाडी भेटल रं "
आणि शेवटी लंगडीने मान टाकलीच," लंगडी गेली रं" मामा ओरडले,राजूच्या मनावर हा फार खोल आघात झाला होता,
भिंगरी रात्रभर ओरडतच होती,सकाळी लंगडीला जेव्हा घेऊन जाऊ लागले अंत्यविधीसाठी तेव्हाही भिंगरी ओरडतच होती,ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत होती,जवळ कोणालाही येवू देत नव्हती,ती जवळपास वेडावलीच होती,दोन तीन दिवस तिन पेंढ्या पण् खाल्या नव्हत्या,राजू मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवित म्हणाला दोन घास खाऊन घे ना ! तिचे डोळे पानावलेले होते,जनावरे पण् किती जीव लावतात ना एकामेकांना,तेवढ्यात मामा म्हणाले "भिंगरीला विकावे लागेल असे वाटतया,एकठी कावरीबावरी झालीया ती" ," नाही", राजू ओरडला " ,मी भिंगरीला नाय विकू देणार," तो ओरडून सांगतच होता आजी समजूत काढत होती " अरे लेका,तुला एकठ्याला तुझ्या मित्राविना कसे वाटेल," तशी ती एकठी पडलीया तिला तिकडे मित्र मैत्रिणी भेटतील मग तिचे मन लागेल," आजीची गोष्ट राजूला समजली होती पण् भिंगरी विना कसे होइल,तो फार अस्वस्थ झाला होतां,दिवस उजाडला तसे गाडीत टाकून भिंगरीला बाजरात घेऊन जाण्याची तयारी झाली होती,गोठा आता लावारिस दिसू लागला होता,एक ...एक म्हैस त्या गोठ्याला सोडून चालली होती,राजू पहिले गाडीत जाऊन बसला होता,आणि गोठ्याकडेच पाहात पाहात त्याचेही डोळे भरून आले होते,भिंगरी पण् गोठ्याकडे पाहून ओरडत होती ,भिंगरीला दोरीने बांधण्यात आले, गाडी सूरू झाली तेवढ्यात आजी म्हणाली " खाटीकाला नग विकुसा," आणि ढसाढसा रडत सुटली ,आजी रडती पण् का हे राजूला कळले नाही,तो म्हणाला काय झाले मामा आजी काहून रडतीया" ,' खाटीक म्हणजे काय रं'
मग मामाने सांगितले तेव्हा मात्र राजुच्या पायाखालची जमीन सरकली,"मामा तुला माझी आन् हाय नग् विकूसा रं भिंगरीला ",पण् मामा ऐकण्याच्या बेतात नव्हता,मला पण् लय वाटत रं पण् भिंगरीचे हाल बघवले जात नाही रं गुड्या, म्हणून म्या मजबूर हाय.
गिऱ्हाइक समोर आले भाव ठरला आणि .... आणि भिंगरी विकली,भिंगरी ओरडतच होती,ते स्वर राजूला अस्वस्थ करत होते,शेवटी मामा म्हणाला लय लाडाची हाय व इका खाटीकाला नग विकुसा,श्रावणात म्या जास्त पैसे घेऊन परत येईल तोवर सांभाळा फक्त,मामाचे डोळे भरले होते,राजू तर पूर्ण पणे अश्रूमध्ये भिजला होता,भिंगरी जात होती राजू तिच्या माग जात होता,हात उंच करून भिंगरीला आवाज देत होता,भिंगरे भिंगरे ....
पण् दलाल तो दलालच,त्याला फक्त पैसा जोडून पैसा कमावयचा असतो ,मामा गाडीत पैसे मोजत होता,आणि तेवढ्यात परत एक मोठा आवाज आला " मामा" तो आवाज राजूचा होता," त्या दलालांनी भिंगरीला खाटीकाला विकले वाटतया ,म्या पाहिले " तसे मामा आणि राजू बाजारात धावले,पण् ना भिंगरी दिसली ना खाटीक ना दलाल,कुठ गेली भिंगरी... म्या सांगितले होते मामा विकू नग सा आता मला भिंगरी पाहिजे म्हणजे पाहिजे,तेवढ्यात मामा ही जोऱ्यात ओरडला " भिंगरी........" "भिंगरी.... ,मला माफ कर भिंगरी"
आणि
आणि... काय चमत्कार खाटीकाला सोडून भिंगरी पळत येतांना दिसू लागली,
कदाचित मामाची ती हाक तिच्यापर्यंत पोहचली होती,
तिच्या माग चार पाच लोक काठ्या घेऊन धावत होते,तिला मारत होते,
तेवढ्यात राजू जोऱ्यात ओरडला" मामा भिंगरी आली वाचवा", ती बघा, तेवढ्यात मामा गाडीवरचा हात काढून माग फिरला,
भिंगरी धावत येत होती तेवढ्यात मामा म्हणाला " थांबा तिला मारू नका" ती माझी भिंगरी आहे ,राजू पळत जाऊन तिच्या गळ्यात पडला होता, भिंगरी ओरडतच होती , तिच्या आर्त स्वरात ,
आणि राजू रडत होता. पण् भिंगरीला परत पाहून त्याला आता मात्र आनंद झाला होता.
*©®डॉ.राज रणधीर*
*९९२२६१४४७१*
*जालना*
प्रतिक्रिया
स्पर्धेत लेखन करण्यासाठी http
स्पर्धेत लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2019 या लिंकवर क्लिक करून लेखन करून प्रकाशित करावे. अन्यथा स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून स्वीकारले जाणार नाही.
शेतकरी तितुका एक एक!
पाने