नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गाथा तुझी बळी रे, विस्तिर्ण सागराची.
तू पांग फेडितोस, कोणा तमा न त्याची.
कष्टास वाव नाही, जरी पुत्र वाघिणीचा,
सांभाळ मृगजळी या, हा पाश अजगराचा.
दुष्काळ सोसतांना, धरती विषण्ण झाली,
कर्जात सावकारी, विळख्यात या बुडाली.
हे सांगता न संपे, बघ रोजचे तराणे,
ओली-सुकी' दलाली, हे कौरवी घराणे.
'एकांत' शांत होई, थकली अबोल वाचा,
ये बंध तोडूनिया, विळख्यातूनी ऋणाच्या.
नरेंद्र भाऊराव गंधारे
63- कबीर वार्ड,हिंगणघाट.
जि.-वर्धा. संपर्क-९२८४१५१७५६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर!
धन्यवाद सर!
Narendra Gandhare
खूप सुंदर रचना!!!
अभिनंदन नरेंद्र!!!
पाने