नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भूमीपुत्र
उठ भुमिपुत्रा जागा हो
या भूमीचा राजा तू
या भूमीचा राजा हो
उठ भुमिपुत्रा जागा हो
विश्वाचा तू अन्नदाता
काय तुझे रे हाल
तुझ्याच भरवश्यावर बांधले
ह्यांनी मोठमोठे महाल
पाठीमागं राहू नको तू
खांद्याचा या खांदा हो
या भूमीचा राजा तू
या भूमीचा राजा हो
उठ भूमिपुत्रा जागा हो
दिवसरात्र कष्ट करूनी तू
पिकविलस काळ्या मातीत सोनं
कुचकामी या धोरणापायी
राहिलं सावकाराचं देणं
सुई आधीच तयार आहे
तू फक्त सुईचा धागा हो
या भूमीचा राजा तू
या भूमीचा राजा हो
उठ भूमिपुत्रा जागा हो
नको घाबरू आता कुणा
नाही केलास तू कुठला गुन्हा
एकत्र येवूनी सगळे
खेचूनी आणू विजय पून्हा
आपुलकीची जान ठेवूनी
लढण्यास तू तयार हो
या भूमीचा राजा तू
या भूमीचा राजा हो
उठ भूमिपुत्रा जागा हो
नको ठेवू मनात कुठला भास
घ्यायचा नाही आता गळ्या फास
भाकर चटनीत काढले आयुष्य
खूप भोगला रे वनवास
हक्काचा लढा लढूनी
अन्यायाचा मारक हो
या भूमीचा राजा तू
या भूमीचा राजा हो
उठ भूमिपुत्रा जागा हो
उठ भूमिपुत्रा जागा हो
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने