नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाऊसपाणी
आभाळातून थेंब नाही डोळ्यात साचले पाणी
ऐकू दे विठ्ठला..ओल्या थेंबांची पाऊसगाणी
भेगाळलेल्या मातीमायला वांझपणाचे दूषण का रे?
जर बापपण विसरून आभाळच विसरलं पाऊसपाणी
एकरभर विकून, शहरातमास्तर झालंय पोरगं
हिस्सा मागायला खळ्यावर तरी येऊ दे राजावाणी
बैल विकून खुंट्यावरचा पैसा फेकला मातीत
अंकुर फुलून होऊ दे सगळीकडे आबादाणी
वारीतल्या भजना-अभंगातच नाचू नको देवा
आम्हीही हरिविठ्ठलच गातो पेरणी करताना रानोरानी
दुथडी भरून वाहू दे गावागावातली गंगा-चंद्रभागा
व्याकूळ भक्ता भेटण्या तूच हो पाऊसपाणी, विठ्ठलवाणी
किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर जि बुलडाणा
मोबा ७५८८५६५५७६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने